शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी राज्य सरचिटणीसपदी अविनाश मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:15 IST

नियुक्तीपत्र प्रदान : कऱ्हाड-दक्षिणेत पक्षाची ताकद वाढविणार; शरद पवार

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांची पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी व नियुक्तीच्या वेळी कधीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सहसा उपस्थित राहत नाहीत. परंतु या कार्यक्रमाला स्वत: अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहिले. अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘दोनच महिन्यांपूर्वी अविनाश मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यासारख्या तरुण व सुसंवाद साधणाऱ्या कार्यकर्त्यांशी सातारा जिल्ह्यात व राज्यात पक्षाच्या वाढीसाठी व विस्तारासाठी त्यांच्यावर काही जबाबदारी द्यावी, असे पक्षाच्या प्रदेश स्तरावरील नेतृत्वाला वाटत होते. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे. गेल्या ६० ते ६५ वर्षांत कऱ्हाड दक्षिण या मतदारसंघातून केवळ तीनच व्यक्ती आमदार झाल्या. राज्यातील इतर मतदारसंघामध्ये ही संख्या जास्त आहे. अविनाश मोहितेंना कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात लक्ष द्यावे लागेल. त्याशिवाय पक्षाने त्यांना काम करण्यासाठी संधी आणि ताकद देण्याचे ठरविले आहे. त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. याशिवाय राज्यात पक्षाने काही कामाची जबाबदारी दिल्यास तीही पार पाडावी लागेल.’ यावेळी अविनाश मोहिते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाबद्दल खात्री असल्याने आम्ही सहकारी या पक्षात कार्यरत झालो आहोत. दिवसेंदिवस सामान्य माणसांचे प्रश्न अतिशय तीव्र होत असताना पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. ती पार पाडण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले जातील. पक्षाला यश मिळवून देताना कुठेही कमी पडणार नाही.’ जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत अविनाश मोहिते यांना आमदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिले. आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.