शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून ‘प्राधिकरण’चे अधिकारी धारेवर

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

सातारा : कार्यालयाच्या आवारात आंदोलनाचा नगरसेवकांचा इशारा

सातारा : सातारा शहरातील विविध भागांत अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याला प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. मात्र, याबाबत नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. तुमच्या चुकांसाठी आम्ही का शिव्या खायच्या?, अशा कानपिचक्या नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न ठेवल्यास प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा नगरसेवकांनी दिला. दरम्यान, शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गुरुवारी (उद्या) दुपारी ४ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बैठक होणार असून, या बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. सातारा शहरातील करंजे, सदर बझार, कामाठीपुरा यासह इतर भागांत पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. याबाबत विचारणा केली असता प्राधिकरण व वीजवितरण कंपनी टोलवाटोलवी करत होते. नेमकी काय समस्या आहे आणि ही समस्या तातडीने सुटावी, यासाठी सातारा पालिकेत नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली पाणीप्रश्नासंबंधी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीस उपनगराध्यक्षा दिनाज शेख, पाणीपुरवठा सभापती लीना गोरे, नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, भालचंद्र निकम, महेश जगताप, विजय बडेकर, प्रवीण पाटील, वैशाली राऊत, भाग्यवंत कुंभार, संदीप साखरे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पंढरीनाथ साठे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बी. एस. अहिरे, वीजवितरण कंपनीचे सातारा शाखा अभियंता बारटक्के व दोघांचे सहकारी उपस्थित होते. शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला असून, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेकदा लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलने करतात आणि आम्हाला जाब विचारतात. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, लाईट नसल्याचे कारण ते पुढे करतात. वीजवितरण कंपनी आणि प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, महेश जगताप, प्रवीण पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (प्रतिनिधी)