शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

औंधला ‘आई उदे गं अंबे उदे’चा जयघोष

By admin | Updated: January 13, 2017 22:31 IST

वार्षिक रथोत्सव : हजारो भाविकांची उपस्थिती; शंभरहून अधिक वर्षांची परंपरा

औंध : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव ‘आई उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि अपूर्व उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.ऐतिहासिक व शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या रथोत्सवास दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. त्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व श्री यमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे, नंदकुमार जोशी, हेमंत हिंगे, अनिकेत इंगळे, केदार हिंगे यांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. यावेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवतपणे देवीचे पूजन करण्यात आले. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. यावेळी चारुशीलाराजे, हर्षिताराजे, सुंंदरगिरी महाराज, मनीषा सिंहासने, वैशाली फडतरे, बाळासाहेब सोळस्कर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, सुनंदा राऊत, जितेंद्र पवार, सुरेंद्र गुदगे, मानसिंग माळवे, धैर्यशील कदम, सतीश फडतरे, सी. एम. पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सुनील घोरपडे, सोनाली खैरमोडे, धनाजी पावशे, प्रभावती चव्हाण, हणमंत शिंदे, संदीप मांडवे, रोशन खंबाटा, बखतावर पोछखानावाला , शिवाजी सर्वगोड, पोपट झेंडे, नवल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उत्साही मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थ यांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री यमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या माळा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले. ‘आई उदे गं अंबे उदे’चा जयघोष केला. रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारूती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळ्यावर नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशिरा पद्माळे तळ्यामध्ये देवीस अभिषेक करून पूजन करण्यात आले. हा रथोत्सव सोहळा सुमारे सहा तास चालला. (वार्ताहर)