शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढले म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: November 16, 2014 00:03 IST

सातारा नगरपालिका : भरपावसातही मोहीम सुरूच

सातारा : अतिक्रमण नसतानाही अतिक्रमण असल्याचे सांगत सातारा नगरपालिकेने शेड काढले म्हणून मल्हार पेठेतील एका युवकाने शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा नगरपालिकेच्या वतीने गेले चार दिवस झाले अतिक्रमण मोहीम सुरू आहे. मात्र, सातारा पालिका ही धनदांडग्यांची अतिक्रमणे तशीच ठेवून सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचा आरोप काहीजण करू लागले आहेत. दरम्यान, पालिकेची अतिक्रमण आणि अवैध बांधकाम हटाव मोहीम गुरुवार, दि. १३ रोजी सुरू होती. यादरम्यान, गिरिजा हॉस्पिटलनजीक असणारे एक शेड पालिकेने काढले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे शेड अजिंक्य प्रकाश भोईटे (वय २४, रा. मल्हार पेठ, सातारा) याचे असून, ते काढण्यात आले. मात्र, हे शेड अतिक्रमणात नसल्याचा भोईटे याचा दावा असतानाही ते पाडल्यामुळे भोईटेला टेन्शन आले. शुक्रवारी दिवसभर तो तणावाखालीच होता.याच तणावाखाली त्याने शुक्रवारी, दि. १४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरातील काचेच्या खिडकीवर स्वत:च्या हाताने मारून घेत दुखापत करून घेतली. यात तो जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)शहरातील कट्टे, फूटपाथ हटविलेसातारा : शहरात सहाव्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. शहरातील काही ठिकाणी रस्त्यामध्ये आलेले फूटपाथ आणि कट्टे हटविण्यात आली. शनिवार पेठेतील किराणा मालाच्या दुकानदाराने स्वत:हून दुकानातील साहित्य काढून घेतले.पाचशेएक पाटीजवळील किराणा मालाच्या दुकानदाराने शनिवारी सर्व साहित्य काढून घेतले. हे साहित्य काढत असताना पालिकेचे कर्मचारी तेथे जातीने हजर होते. त्या दुकानाची रस्त्यामध्ये आलेली भिंत सोमवारी पाडण्यात येणार आहे. दरम्यान, राजलक्ष्मी टॉकीजसमोरील फूटपाथ आणि काही कट्टेही अतिक्रमण हटाव मोहिमेने काढले. दरम्यान, दुपारी शहरात पाऊस पडल्याने अतिक्रमण मोहिमेवरही त्याचा परिणाम झाला. पावसामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी पुन्हा अतिक्रमण काढले जातील, असे भाग निरीक्षक अनिल भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)