शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाच्या मठात चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: June 29, 2016 00:07 IST

खटाव तालुका : गुरू-शिष्यावर गावकऱ्यांकडून हल्ला; मारहाणीच्या चित्रीकरणाचा प्रयत्न

वडूज : खटाव तालुक्यातील एका गावात सातवर्षीय शाळकरी बालिकेवर मठातील भोंदू बाबाच्या शिष्याने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही वार्ता समजताच गावातील युवकांनी त्या शिष्यास चोप दिला, तेव्हा या भोंदू बाबाने मोबाईलमधून मारहाणीचे चित्रीकरण करून धमकी दिल्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.याबाबतची माहिती अशी, खटाव तालुक्यात हणमंत बुवा रामदासी या भोंदू बाबाचा मठ आहे. तालुक्यातील एक मुलगी आठ दिवसांपूर्वी या मठात गेली होती. त्यावेळी महाराजांचा शिष्य योगेश शामराव जाधव (वय २५, रा. गुरसाळे) याने एकटी मुलगी गाठून तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी मुलीस त्रास होऊ लागल्यानंतर तिने घडला प्रकार आईस सांगितला. त्यावेळी आईने महाराजांना जाब विचारला. मात्र भोंदू बाबांनी घडल्या प्रकाराबद्दल कोठेही वाच्यता करू नका, मी जाधव यास मठातून हाकलून देतो. तसेच घटनेबाबत जास्त चर्चा केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. त्यानंतर शिष्य व महाराज आठवडाभर परागंदा झाले होते. दरम्यान, घटनेबाबत गावातील लोक शांत असून कसलाही गोंधळ झाला नाही, हे पाहून मंगळवारी (दि. २८) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काहीच घडले नाही, अशा आर्विभावात महाराज मठात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील युवकांनी तातडीने मठ गाठला. तेथे शिष्यास चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी महाराजाने अशी मारहाण करु नका, तुम्हास जड जाईल, असे म्हणत मोबाईलवरुन चित्रीकरण केले. लोकांचा संताप अनावर झाल्यानंतर युवकांनी महाराज हणमंत बुवा व त्याचा शिष्य योगेश जाधव या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)