शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
3
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
4
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
5
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
6
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
7
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
8
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
9
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
10
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
11
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
12
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
13
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
14
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
15
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
16
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
17
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
18
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
19
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
20
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

कोरेगावात निवडणुकीचे वातावरण तापले

By admin | Updated: May 4, 2016 01:08 IST

प्रभात फेऱ्या सुरू : सोमवारच्या आठवडी बाजारातही मतदारांच्या गाठीभेटी; प्रभागरचनेमुळे अनेकांची गोची : कोरेगावचा रणसंग्राम

साहिल शहा --कोरेगाव --नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेबरोबरच आरक्षणे जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तातडीने नवीन प्रभागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीचे वातावरण तापण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिवसभर प्रभाग रचनेविषयी शहरात चर्चा होती. अनेकजण नकाशे आणि माहिती फलक बारकाईने निरीक्षण करत होते. अवघ्या वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळी किशोर बाचल व किरण बर्गे यांनी युती करुन ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र उपसरपंचपदावरून सत्ता विभागली गेली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीत अंतर्गत वादंग होऊन विकासकामे ठप्प झाली होती. त्याच वेळीपासून नगरपंचायत स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर नगरपंचायतीची फाईल अनेक दिवस पडून होती, अखेरीस दि. ५ मार्च रोजी शासनाने नगरपंचायत स्थापनेचा अध्यादेश काढला. कोरेगावात नगरपंचायत स्थापनेमुळे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेची दारे अलगद बंद झाली, त्यामुळे नगरपंचायतीची प्रभाग रचना कशी होते आणि आरक्षणे काय पडतात, याची चर्चा गेल्या दीड महिन्यापासून होती. प्रशासक किरणराज यादव व प्रांताधिकारी अजय पवार यांनी शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करत प्रभाग रचना केली आहे. सोमवारी सकाळी प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडत काढण्यात आली. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सदस्यांसह अनेक इच्छुकांनी आपल्याला सोईस्कर प्रभाग रचना पाहून लागलीच प्रभागात फेरी मारण्यास सुरुवात केली आहे. सोमवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने शहरात गर्दी असते, मात्र तरी देखील भर उन्हात इच्छुकांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नवीन प्रभाग रचना व त्यातील मतदार यावर सध्या भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीचे जुने वॉर्ड फोडल्याने अनेकांची आता नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभागांमुळे गोची झालेली आहे. काहींची तर दमछाक होणार आहे. मातब्बर नशीब आजमाविण्याची शक्यतानगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही, त्यामुळे राजकीय क्षेत्रात विविध पदे भूषविलेले पदाधिकारी अजून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेताना दिसत आहेत. प्रभाग रचना व आरक्षण सोडतीसाठी जाणीवपूर्वक नेतेमंडळींनी हजेरी लावली, त्यांना सोईस्कर प्रभाग सुद्धा मिळाले आहेत, मात्र नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य जयवंत पवार, रवींद्र बोतालजी, माजी सरपंच अ‍ॅड. प्रभाकर बर्गे व बाळासाहेब बाचल, ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतिभा बर्गे, राहुल बर्गे, राजेंद्र बर्गे, संजय पाटील, संजय पिसाळ, महेश बर्गे, दिलीप बर्गे, संतोष पवार, डॉ. गणेश होळ, दिनेश सणस, सुनील बर्गे, संतोष चिनके, किशोर बर्गे, नितीन ओसवाल, मोहन शिंदे, हणमंतराव पवार यांच्यासह आजी-माजी सदस्य यावेळी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.