शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

विधानसभेचा पडला खडा; मनोमिलनाला गेला तडा !

By admin | Updated: November 11, 2014 00:04 IST

कृष्णाकाठचे राजकारण : भाऊ-आप्पांच्या वारसदारांमध्ये पुन्हा अंतर

प्रमोद सुकरे - कऱ्हाड --गेल्या पाच वर्षांत कृष्णाकाठावर ‘यशवंत हो, जयवंत हो’ हे गाणं ऐकायला मिळत होतं; पण विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘खडा’ पडला अन् कृष्णाकाठच्या बहुचर्चित मोहिते-भोसले मनोमिलनाला तडा गेला. दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमातून याची प्रचीती आली. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले हे दोघे सख्खे भाऊ! जणू राम लक्ष्मणाची जोडी; पण कालांतराने त्या दोघांमध्ये ती ‘गोडी’ राहिली नाही अन् पुढं काय ‘रामायण’ घडलं, हे कृष्णाकाठालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. दोन भावांतला संघर्ष साऱ्यांनी पाहिला आहे. या संघार्षाने कृष्णाकाठाचं, कृष्णा उद्योग समूहाचं अपरिमित नुकसान होत होतं. दोघांच्या भांडणात तिसरेच राजकीय लाभ उठवत होते; पण कोणी काही बोलायला तयार नव्हते. भाऊ, आप्पांवर प्रेम करणारे लोकही अस्वस्थ झाले होते. दरम्यान, हा संघर्षरूपी आजार बरा व्हावा म्हणून एका घाटावरच्या डॉक्टरने पुढाकार घेतला. मोहिते-भोसले कुटुंबातील दोन डॉक्टरही बरोबर घेतले अन् ‘मनोमिलन’ नावाचा उपचार झाला. दोन परिवार जोडले गेले म्हणे! २२ डिसेंबर २००७ ला ट्रस्टवर ‘मनोमिलना’ला अनुसरून पहिला कार्यक्रम झाला खरा; पण एका ‘दादा’ सदस्याने त्याला दांडी मारली. त्यामुळे मनोमिलनाचे वारे ‘वाऱ्यावरची वरात’ ठरणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर येणके येथे एक छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात मदनदादा, इंद्रजितबाबा अन् अतुलबाबांच्या गळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्रित पुष्पहार घातला. मग हे मनोमिलन घट्ट झाल्याची चर्चा झाली.मोहिते-भोसले मनोमिलनाने ‘कृष्णे’ची निवडणूक एकत्रित लढविली. त्यात मनोमिलन पार्टीचा पराभव झाला. हा पराभव मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या जिव्हारी लागला. ‘तुमचं मनोमिलन नक्की झालंय का,’ असे ‘चिमटे’ कार्यकर्ते मोहितेंना काढू लागले. मग ते चिमटे स्वकीयांकडून, घरच्यांकडून, मार्गदर्शकांकडून अन् विरोधकांकडूनही सुरू झाले. दोन वर्षांपूर्वी या मनोमिलनाचा एक चिंतन मेळावा कऱ्हाडच्या मंगल कार्यालयात झाला. यात एका मोठ्या डॉक्टरबाबांनी छोट्या डॉक्टरबाबांना चिमटे काढले. मदनराव मोहितेंनी ज्येष्ठत्वाच्या भूमिकेतून दटावले तर मनोमिलनातील मुख्य सूत्रधार असणारे घाटावरचे डॉक्टर तर वेळोवेळी या मनोमिलनाला डोस देतच राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल भोसलेंनी उत्तरेवर केलेली स्वारी मदनराव मोहितेंना रूचली नव्हती. तरीही तालुक्यातील महाआघाडी एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही डॉ. अतुल भोसलेंनी भाजपचे कमळ हातात धरण्याचा निर्णय घेतला अन् मनोमिलनात खऱ्या अर्थाने मिठाचा खडा पडला. मदनराव मोहिते चक्क पृथ्वीराज चव्हाणांचे प्रचारप्रमुख बनले तर डॉ. इंद्रजित मोहितेही चव्हाणांच्या प्रचारातच दिसले. त्यामुळे आता या मनोमिलनाला खऱ्या अर्थाने तडा गेल्याचे कार्यकर्त्यांनी जाणले. नुकतीच ७ नोव्हेंबरला दिवंगत यशवंतराव मोहिते यांची जयंती झाली; पण या दिवशी भाऊंच्या निवासस्थानी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित न राहता डॉ. सुरेश भोसलेंनी रेठऱ्यातच स्वतंत्र कार्यक्रम घेत आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘संघर्ष करीत बसण्यापेक्षा चांगल्या कामासाठी एकमेकांना मदत केली पाहिजे,’ अशा शब्दांत भावनांना वाट मोकळी करून दिली. दुसरीकडे डॉ. इंद्रजित मोहितेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात डॉ. पतंगराव कदम यांनीही ‘मनोमिलन सारखं का बिघडतंय हे समजायला मार्ग नाही. खरंतर आता सगळेच सुज्ञ आहेत. यांनी एकमेकाला समाजावून घेतले पाहिजे,’ असा सूर लावला. त्यामुळे तडकलेल्या मनोमिलनाची सध्या तालुक्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. नजीकच्या काळात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत हे मनोमिलन एकत्र दिसणार की फक्त सोपस्कारच मनोमिलन पार पाडणार, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. इंद्रजित, अतुलबाबांनी टीका टाळलीविधानसभा निवडणुकीत मोहितेंनी कमळ हातात धरलेल्या पुतण्याचा प्रचार केला नाही. उलट यादरम्यान ते काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात दिसले; पण प्रचारात टीकाटिपण्णी होत असताना मदनराव मोहिते वगळता डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. अतुल भोसलेंनी परस्परांवर टीका केलेली पाहायला मिळाली नाही.उंडाळकर म्हणतात, हे तर ‘मनी’मिलनबहुचर्चित मनोमिलनावर अनेकांनी टीका केली. त्याला विलासराव पाटील-उंडाळकरही अपवाद नाहीत. निवडणुकीपूर्वी झालेल्या अनेक सभांमधून उंडाळकरांनी या मनोमिलनाचा ‘मनी’मिलन असा उल्लेख केला होता.