शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आसामचं विशेष पथक कोरेगावात

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

मतदारांच्या संख्येत वाढ : चार ठिकाणी सहाय्यकारी मतदानकेंद्रे

कोरेगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. मतदानासाठी आवश्यक ती यंत्रणा मंगळवारी सकाळी ११ वाजता रवाना करण्यात आली. संवेदनशील म्हणून गणल्या जाणाऱ्या या मतदारसंघाची ओळख आता बदलू लागली असून, या निवडणुकीत एकही मतदान केंद्र संवेदनशील राहिलेले नाही. मतदानाची टक्केवारी वाढावी प्रशासनाने चार मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. एकंदरीत मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था असून, मतदान व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ. संजय कुंडेटकर यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात २ लाख ८३ हजार ३५७ मतदार होते, नव्याने पुनर्रिक्षण मोहीम राबविण्यात आल्याने मतदारांमध्ये वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०१४ अखेर २ लाख ९० हजार २५९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ४९ हजार ४५९ पुरुष तर १ लाख ४० हजार ८०० मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महसूल प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. एकूण ३४७ मतदान केंद्रे असून, जेथे १२०० हून अधिक मतदान आहे. अशा चार ठिकाणी मतदान सुलभरित्या होण्यासाठी सहाय्यकारी मतदान केंद्रे बनविण्यात आली आहेत.जळगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे, त्यामुळे मतदान प्रक्रियेनंतर मतदानाच्या मशीन्स तेथेच जमा करण्यात येणार आहे, तशी व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत चार दिवस मशीन्स राहणार असल्याने तेथे स्थानिक पोलीस दलासह आसाम येथील विशेष रेल्वे पोलीस पथक, वन विभाग आणि सोलापूर येथील राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)