शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीचा जाब विचारल्याने अतीतला युवकाचा खून

By admin | Updated: November 11, 2016 22:43 IST

वातावरण तणावपूर्ण

सातारा : ‘मित्राच्या बहिणीस त्रास का देतोस,’ असे विचारल्याच्या कारणावरून युवकांच्या दोन गटांत झालेल्या वादावादीतून चिडून जाऊन चुलत्या-पुतण्याने अनिकेत संजय देशमुख (वय २०, रा. अतीत, ता. सातारा) याचा चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना अतीत, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अनिकेत देशमुख याच्या एका मित्राच्या बहिणीस शुभम जाधव हा भर रस्त्यात काहीतरी विचारत होता. याची कल्पना संबंधित मुलीने भावास दिली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास अनिकेत देशमुख, तुकाराम लांभोर, प्रवीण वाघमारे, प्रसाद साळुंखे, शुभम सार्वेकर हे मित्र महामार्गालगत असणाऱ्या एका बंद दुकानाच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. त्यांनी शुभम जाधवला तेथे बोलवून घेतले. यावेळी या सर्वांनी त्याला ‘मित्राच्या बहिणीस तू त्रास का देतोस,’ असा जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. या प्रकारानंतर शुभम हा तेथून निघून गेला. काही वेळाने चुलता विजय जाधव याला दुचाकीवरून घेऊन पुन्हा तेथे तो परत आला. यावेळी त्याच कारणावरून या सर्वांच्यात पुन्हा भांडणास सुरुवात झाली. यावेळी अचानक विजय जाधव याने अनिकेत देशमुख याचा गळा पकडला. अनिकेतचे मित्र त्याला सोडवत असतानाच शुभम जाधवने त्याच्याकडील धारदार चाकूने अनिकेतच्या पोटावर जोरदार दोन वार केले. अचानक घडलेल्या या घटनेने भांबावलेल्या त्याच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीवरून नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला नेले. मात्र, उपचारापूर्वीच अनिकेतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शुभम जाधव व विजय जाधव यांनी घटनास्थळावरून पलायन केले. अनिकेतचा मृत्युमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. (प्रतिनिधी)