शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मयूरवर पहिला वार करणाऱ्यास अटक

By admin | Updated: June 23, 2014 00:53 IST

चौथा आरोपी : मुख्य संशयिताच्या ओळखीतून खुनात सहभाग

कऱ्हाड : शहरातील सोमवार पेठेतील मयूर गोरे याच्या खूनप्रकरणात चौथ्या आरोपीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. श्रीयाल ऊर्फ गोट्या भीमराव धेंडे (वय २३, रा. वानलेसवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. श्रीयाल हा रविवारी स्वत:हून पोलिसांना शरण आला. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे.पिग्मी एजंट असणाऱ्या मयूर गोरे या युवकाचा जखिणवाडी येथील पाणंद रस्त्यावर काही दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. चार हल्लेखोरांनी मयूर व त्याचा मावसभाऊ सिद्धार्थ यांच्यावर सुरूवातीला कोयत्याने वार केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी सिद्धार्थ उसाच्या शेतात तर मयूर रस्त्याकडील लोकवस्तीकडे धावला. त्यावेळी हल्लेखोरांनी पाठलाग करून मयूरला गाठले. त्यांनी त्याच्यावर गोळीबार करून तसेच डोक्यात खोऱ्याचा घाव घालून मयूरचा खून केला. या खून प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणाच्या तपासात सुरूवातीला मास्टरमार्इंड वैभव रमेश माने (रा. कार्वेनाका-कऱ्हाड) याला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. नातेवाइक महिलेशी मयूरचे असलेले मैत्रीचे संबंध भविष्यात आपल्यासाठी बदनामीकारक ठरू शकतात, या भीतीपोटी वैभव माने याने मयूरचा खून करविला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी वैभवला अटक करून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर खुबू पवार (रा. लमाण तांडा नं. २, विजापूर), अनिल तानाजी माळी (रा. कालेटेक) या दोघांना अटक केली. फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच रविवारी श्रीयाल ऊर्फ गोट्या धेंडे स्वत:हून पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली. श्रीयाल याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. २०११ मध्ये सुपारी देऊन झालेल्या खूनप्रकरणात तो आरोपी होता. मयूर गोरेची ज्याने सुपारी घेतली होती त्याच्याशी कळंबा कारागृहात असताना त्याची ओळख झाली. सहा महिन्यांपूर्वीच श्रीयाल व संबंधित आरोपी दोघेही जामिनावर बाहेर आले.त्यानंतर श्रीयालने सांगलीत रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी मयूर गोरे खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सांगलीला गेला असता त्याची आणि श्रीयालची भेट झाली. त्यानंतर ७ जूनला संबंधित मुख्य आरोपीला फोन करून श्रीयाल कऱ्हाडला राहण्यासाठी आला. कऱ्हाडात आल्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींनी कट रचून त्यानुसार मयूरचा खून केला.या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)