शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची डरकाळी नव्हे म्याँव...!

By admin | Updated: June 26, 2016 00:35 IST

सुनील तटकरे : जलयुक्त शिवारमधून भाजपने ठेकेदार पोसल्याचा आरोप

सातारा : ‘शिवसेना डरकाळी फोडण्याचा आव आणत आहे; परंतु प्रत्यक्षात त्यांचे म्याँव...म्याँव सुरू आहे. सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवू शकत नाही,’ अशी सडेतोड टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. ‘कोल्हापूर येथे जात असताना तटकरे यांनी शनिवारी दुपारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यातील जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेत परिवर्तन केले; परंतु जनतेची अपेक्षापूर्ती करण्याऐवजी एकमेकांचे वस्त्रहरण सुरू आहे. हिंंदुत्ववादासाठी ओळखले जाणारे दोन्ही पक्ष आज वेगळीच भाषा बोलत आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावे,’ असा सल्लाही तटकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिला. राज्यात सलग दोन वर्षे दुष्काळ असताना आणि राज्यासमोर विविध प्रश्न असताना सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांची जाहीरपणे निंदानालस्ती करीत आहेत. त्यामुळे राजकीय मनोरंजन होत असले तरी लोकांमध्ये सरकारबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होत आहे. राज्याची परंपरा, सभ्यता याला मूठमाती देण्याचा प्रयत्न होत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत यापुढे धर्मनिरपेक्ष पक्षाची आघाडी करावी, नाहीतर विरोधी पक्षात बसावे, अशा सूचना स्थानिक पातळीवरही देण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. कोणत्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, सदस्य, कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील तर पक्षातंर्गत मतभेद दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांत प्रबळ विरोधक म्हणून काम केल्याचा दावा करीत दुष्काळ, महागाई, परीक्षा शुल्क यासह विविध प्रश्नांवर आंदोलन केल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावरच्या आंदोलनाबरोबरच विधिमंडळातही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रमकपणे राष्ट्रवादीने भूमिका मांडल्याचेही त्यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून भाजपनेच ठेकेदारांना पोसण्याचे काम केल्याचा आरोप करीत येत्या अधिवेशनातही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा दिला. ‘स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये तरुणांना संधी देण्याची सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली असून, त्याप्रमाणे गुणवत्तेवर संधी देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने लढविणार असून, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी क्रमांक एकवर राहील,’ असेही तटकरे यांनी सांगितले. सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण त्याचबरोबर ताळमेळ नसून गोंधळलेली स्थिती असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीची ध्येयधोरणे, वैचारिक मत स्पष्ट असून, त्यानुसारच आगामी निवडणुका लढविल्या जातील. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी तालुकानिहाय दौरा करणार असून, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये सहा महसूल विभागांमध्ये विभागनिहाय मेळावे होणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामूलकर, जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)