शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद ते आदर्की फाटा मार्गासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

सातारा : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याने ...

सातारा : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याने त्याची मोठी दुरवस्था झाली होती. निधी मंजूर झाल्याने नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकर मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरुस्ती होण्याबाबत व हा मार्ग वाहतुकीस योग्य करण्यात यावा, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग पुण्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी वरील आदर्की फाटा ते वाढे फाटा १७/१४५ ते ४४/०० कि.मी.मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. परिणामी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे लोणंद परिसराच्या अनेक गावांतील ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाची मागणी केली होती.

खा. श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती, तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनादेखील पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून लोणंद ते आदर्की फाटा एकूण ०.०० ते १७/ १४५ कि.मी. लांबीच्या रस्ता मजबुतीकरण कामासाठी १२.८९ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी खा. पाटील यांना पत्राद्वारे कळविली आहे. हा निधी मंजूर झाल्याने या खराब झालेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळणासाठी सोयीचे ठरणार आहे.