शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्रेमींना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

फांद्या हटविल्या सातारा : सदर बझार येथे गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या वटवृक्षाच्या धोकादायक फांद्या सातारा पालिकेकडून हटविण्यात आल्या. ...

फांद्या हटविल्या

सातारा : सदर बझार येथे गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या वटवृक्षाच्या धोकादायक फांद्या सातारा पालिकेकडून हटविण्यात आल्या. या फांद्या पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर पडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात होती. त्यामुळे सातारा पालिकेच्या वृक्ष विभागाने धोकादायक फांद्या तातडीने हटविल्या.

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरचा अभाव जाणवत आहे.

दुरुस्तीची गरज

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कठड्यांच्या दुरुस्तीबाबत अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. घाटातील रस्त्याचीही ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे वाहनधारकांना अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे.

गांधी मैदान बनले वाहनतळ

सातारा : ऐतिहासिक महत्त्व लाभलेला साताऱ्यातील गांधी मैदान परिसर आता कात टाकू लागला आहे. पालिकेच्या वतीने येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा परिसर अधिकच खुलून गेला आहे. गांधी मैदानावरील मोकळ्या जागेत खाद्यपदार्थांच्या गाड्या चालविल्या जातात. लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी येथील गाड्या मात्र अद्यापही बंद आहेत. या मोकळ्या जागेचा वाहनधारक वाहनतळ म्हणून वापर करू लागले आहेत.

घाणीचे साम्राज्य

सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडी मुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने विक्रेत्यांबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर

सातारा : शहरातील फळ व भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केले जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅँड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा कारवाई मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

डुकरांचा उपद्रव

सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराह पालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

वाहतुकीची कोंडी

सातारा : शहरातील तहसील कार्यालय परिसरात वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. तहसील कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळही गाड्या लावल्या जातात. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना अनेक अडचणी निर्माण होतात. पोलिसांनी येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

सातारा : पालिकेकडून वारंवार स्वच्छता करूनही सदर बझार येथील गटारे व नाले कचऱ्याने तुडुंब भरत आहेत. गटारातील सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.

मोहीम सुरू करावी

सातारा : कर्कश आवाजाचा हॉर्न असलेल्या वाहनचालकांविरोधात शहरात वाहतूक शाखेकडून सुरू केलेली कारवाई वर्षभरापासून बंद आहे. या कारवाईची वाहनधारकांनी धास्ती घेतली होती. ही मोहीम बंद असल्याने नागरिकांना पुन्हा कर्कश हॉर्नचा त्रास सहन करावा लागत आहे. ही कारवाई पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.