शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक मद्यपी चालक घरी!

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

विभाग नियंत्रकांची कारवाई : दारू पिऊन प्रवाशासी घातली होती हुज्जत

सातारा : दारू पिऊन एसटी वेडीवाकडी चालविल्यामुळे मेढा आगारातील चालकाला निलंबित केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार, दि. १४ रोजी सातारा आगारातील आणखी एका तळीराम चालकाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. यामुळे एसटी विभागातील चालक-वाहकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालविणे गैर आहे. पण, आजवर फारशा कारवाया झाल्याचे समोर येत नव्हते. मद्यपान करण्याने संबंधित चालकाच्या आरोग्याला धोक्याचे आहेच; पण त्याहीपेक्षा एसटी बसमध्ये बसलेले पन्नास प्रवासी व रस्त्यावरून निघालेल्या असंख्य वाटसरूंच्या दृष्टीने जीवघेणा ठरू शकते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या साताराचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी कडक पावले उचलली आहेत. मेढा आगारातील चालक नितीन मोरे याला तीनच दिवसांपूर्वी निलंबित केले होते. त्याचवेळी भविष्यात कोणी मद्यपान केल्याचे आढळल्यास त्याला निलंबित केले जाईल, त्याचप्रमाणे त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचा इशारा विभाग नियंत्रक थोरात यांनी दिला होता.अशीच घटना सोमवारीही घडली. सातारा आगारातील चालक प्रदीप जनार्दन जाधव (रा. मर्ढे, ता. सातारा व हल्ली रा. रामनगर, सातारा) हे अंबेदरे येथून सातारा आगारात सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आले होते. या प्रवासादरम्यान जाधवने मद्यपान केले होते. या नशेत त्याने एका प्रवाशासी हुज्जत घातली होती. त्यामुळे चिडलेल्या प्रवाशाने वाहतूक नियंत्रक कक्षात येऊन संबंधित चालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, गर्दीचा फायदा घेऊन जाधव पळून गेला. त्याचा अनेकवेळा शोध घेऊनही तो सापडला नाही.याप्रकरणी विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव थोरात यांच्याशी संपर्क साधला असता रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस व एसटी अधिकाऱ्यांनी रामनगर येथील जाधव याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी वैद्यकीय तपासणी केली आहे. जाधव याला शुक्रवार, दि. १७ रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.मद्यपान करून बस चालविली तसेच प्रवाशांची हुज्जत घातल्याच्या कारणावरून सातारा आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एम. कांबळे यांनी विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई केली. (प्रतिनिधी)पोलीस अधीक्षकांनी घातले लक्षजाधव याला वैद्यकीय तपासणीसाठी सातारा बसस्थानकातील पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, तेथून जाधव पळून गेला. यासंदर्भात एसटीचे अधिकारी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती करत होते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. एसटीच्या अधिकाऱ्यांना शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाण्याकडे पाठविले जात होते. त्यानंतर विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला. अधीक्षक देशमुख यांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर साडेदहाच्या सुमारास जाधवला राहत्या घरातून ताब्यात घेतले. आगारातून गाडी नेल्यानंतर आपण काहीही करू शकतो, असा समज चालक-वाहकांचा असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही. मेढा आगारापाठोपाठ सातारा आगारातील चालकालाही मद्यपान करून वाहन चालविल्याच्या कारणावरून निलंबित करत आहे. भविष्यातही कोणाचीही गय केली जाणार नाही. मद्यपी चालकाला मदत केल्यास आगार व्यवस्थापकापासून वाहकापर्यंत असे तीन ते चार जणांवर कारवाई केली जाईल.- धनाजी थोरात,विभाग नियंत्रक, सातारा.