शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर निखळ निर्मितीचा आनंद, उद्योजिकांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:08 IST

सातारा : कोणी फिरत्या चाकावर मातीच्या भांड्यांना आकार देतंय, तर कोणी लाकडी लाटणी बनविण्यात व्यस्त आहे. माणदेशातल्या उद्योजिका महिला महोत्सवाच्या निमित्ताने साताºयात येऊन निखळ निर्मितीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवारपासून सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सव भरला आहे. या महोत्सवासाठी माणदेशातल्या महिला भगिनी स्वनिर्मित वस्तू घेऊन ...

ठळक मुद्देमहोत्सवातील एका स्टॉलमध्ये एक महिला उद्योजिका स्वत: लाकडापासून लाटणे बनवित होती. हैद्राबाद, काश्मीर येथूनही मोठ्या प्रमाणावर स्टॉल म्हसवड येथील भारत कुंभार यांच्या स्टॉलमध्ये मातीची चूल पाहायला मिळत होती.

सातारा : कोणी फिरत्या चाकावर मातीच्या भांड्यांना आकार देतंय, तर कोणी लाकडी लाटणी बनविण्यात व्यस्त आहे. माणदेशातल्या उद्योजिका महिला महोत्सवाच्या निमित्ताने साताºयात येऊन निखळ निर्मितीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

माणदेशी फांउडेशनच्या वतीने गुरुवारपासून सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर माणदेशी महोत्सव भरला आहे. या महोत्सवासाठी माणदेशातल्या महिला भगिनी स्वनिर्मित वस्तू घेऊन आल्या आहेत. त्यामध्ये लाटणे, पळपूट, मातीच्या चुली, मातीची भांडी, तवे, जाती, कढया अशा वस्तू आहेत. गेल्या सात वर्षांपूर्वी महोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा माणदेशी घोंगडी व इतर गृहउद्योगातील वस्तू पाहायला मिळत होत्या.

यंदाच्या महोत्सवात चक्क माणदेशातील भाजीचे स्टॉलही आले आहेत. म्हसवडला माणदेशी फांउडेशनच्या माध्यमातून माणगंगा नदीवर मोठा बंधारा बांधला आहे. या बंधाºयामुळे नदीचे पाणी अडले तसेच आजूबाजूच्या विहिरींनाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे हंगामी पिके घेणारे शेतकरी आता बागायती पिकांकडे वळले आहेत. म्हसवड येथील शेतकरी विजय लिंगे सांगत होते. १२ एकरांत आता बागायत होती. वांगी, भेंडी, मेथीची भाजी घेऊन ते महोत्सवात सहभागी झाले होते.

या महोत्सवात केवळ माणदेश व साताºयातील महिलांचे स्टॉल नाहीत तर हैद्राबाद, काश्मीर येथूनही मोठ्या प्रमाणावर स्टॉल आले आहेत. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. लोक उत्सुकतेने माहिती घेताना पाहायला मिळत होते. 

कोंबड्यांचा खुराडा  -वडूजचे संतोष जाधव हे बांबूपासून बनविलेल्या वस्तू घेऊन आले आहेत. टोपली, फुलदाणी, सूप यासोबतच त्यांनी आणलेला कोंबड्यांचा खुराडाही लक्ष वेधत आहे.म्हसवडातही पिकतंय आता माळवं--म्हसवडात पूर्वी पाण्याअभावी बागायती पिके मर्यादित स्वरुपात घेतली जात होती. आता मात्र पश्चिम भागाप्रमाणेच या परिसरात बागायत पिके घेतली जात असून, त्याची विक्री महोत्सवात केली जात आहे.मातीची चूल अन् भांडी--म्हसवड येथील भारत कुंभार मातीची भांडी घेऊन महोत्सवात दाखल झाले आहेत. मातीची भाजलेली चूल, मडकी, विविध भांडी, दही ठेवण्याचे भांडे, भाजीची भांडी त्यांनी आणली आहेत