शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर नाका येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, ...

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर नाका येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी वसंत पंधरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक सरोजिनी पाटील, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाका येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा आमदार चव्हाण यांच्यासमोर सादर केला. हा उड्डाण पूल साडेतीन किलोमीटर लांबीचा असणार आहे. सातारा-कागल या लेनवर महामार्गावरील सर्वांत अधिक लांबीचा हा पूल असणार आहे.

कोल्हापूर नाका येथील वाढते अपघात व वाहतूक कोंडी यावर नवीन उड्डाणपूल होईपर्यंत तत्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था होण्यासाठी सूचना व आराखडा तयार करावा, अशी सूचना यावेळी आमदार चव्हाण यांनी दिली. या सर्व विभागांची पुढील दहा दिवसांत पुन्हा बैठक घेऊन पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेतला जाईल तसेच नवीन उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री व सचिवांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

- चौकट

पूल सहापदरी; उपमार्ग चौपदरी

पूल सिंगल पिलर रचनेवर उभारला जाणार असून तो सहापदरी असणार आहे तसेच या उड्डाणपुलाखालील उपमार्ग चौपदरी असणार आहे. हॉटेल पंकज येथून एनपी मोटर्सपर्यंत हा पूल असणार आहे. या साडेतीन किलोमीटर लांबीच्या पुलामुळे कऱ्हाड व मलकापूर शहरातील वाहतूक नियंत्रित करता येणार आहे तसेच या दोन शहराच्या वाहतुकीमुळे महामार्गावरील होणारे अपघात टाळता येऊ शकतील.

फोटो : ०६केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.