शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीच्या काळातही एफआरपी देण्यास अजिंक्यतारा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:40 IST

सातारा : ‘अजिंक्यतारा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीच्या कायद्यानुसार उसाला दर दिला आहे. तरी सुध्दा एफआरपी. अदा करण्यासाठी कोणतीही ...

सातारा : ‘अजिंक्यतारा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीच्या कायद्यानुसार उसाला दर दिला आहे. तरी सुध्दा एफआरपी. अदा करण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी कारखान्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून लवकरच डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅन्टचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अजिंक्यतारा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर रविवारी झाली. या ऑनलाईन सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी ज्या सभासदांनी कारखान्याकडे नोंदणी केली होती, अशा सभासदांना सभेची लिंक पाठविण्यात आलेली होती. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. चेअरमन सर्जेराव सावंत अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक देसाई यांनी सभेची नोटीस व अहवाल वाचन केले. सर्व विषयास ऑनलाईन उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, आत्तापर्यंत या हंगामात ६,१७,१५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्यामध्ये ३,०१,८१० क्विंटल रॉ शुगर उत्पादन घेऊन रॉ शुगर थर्ड पार्टीमार्फत निर्यात करण्यात येत आहे. चालू गाळप हंगामामध्ये आत्तापर्यंत ५,२८,८३० मे.टन उसाचे गाळप झाले असून या उसाची प्रति मे.टन रूपये २६०० रुपये प्रमाणे पहिल्या ॲडव्हान्स हप्त्याची होणारी रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. या हंगामाकरिता कार्यक्षेत्रामध्ये गाळपासाठी उपलब्ध असलेले क्षेत्र विचारात घेता ७.०० लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.

न्यू दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन या शिखर संस्थेकडून कारखान्यास पुरस्कार मिळाल्यामुळे शेंद्रे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांचे कौतुक केले. कारखान्याचे संचालक नामदेव सावंत यांनी ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानले. सभेला सर्व संचालक आणि सभासद ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोट

मागील हंगामात कारखान्याचा साखर उतारा हा अत्त्युत्तम राहिल्यामुळे चालू सन २०२०-२०२१ चे गाळप हंगामाकरिता आपले कारखान्याची एफआरपी प्रति मे.टन रूपये ३०४३ रुपये इतकी निघालेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दर दहा दिवसांचे ऊस पेमेंट करणारा आपला कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना आहे.

- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

फोटो ओळ : शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले.

फोटो ने म: १६बाबाराजे