शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

फुकटात ‘हवा’; गुंडांचं ‘सोशल’ गँगवॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:12 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कºहाडात कमी नाही; पण आता ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कºहाडात कमी नाही; पण आता हे ‘फॅड’ चक्क सोशल मीडियावर वाढलंय. चित्रविचित्र ‘स्लाईड शो’ तयार करून ते ‘इंटरनेट’वर ‘अपलोड’ करण्याची भलतीच ‘के्रझ’ सध्या निर्माण झालीय. हे सोशल गँगवॉर पोलिसांचीही डोकेदुखी बनल्याचे चित्र आहे.कºहाडच्या चौकाचौकात पूर्वी डझनावारी फलक लागायचे. मोठ-मोठ्या फोटोत ‘गल्लीदादा’ झळकायचे; पण अशा फलकांवर पालिकेने अंकुश आणला. त्यामुळे ‘हवा’ निर्माण करू पाहणाऱ्यांची गोची झाली. त्यानंतर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं ‘फॅड’ निघालं. मध्यरात्री भररस्त्यात हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापण्याचा प्रकार अनेकांनी केला. त्याद्वारे ‘वट’ बसवायचा प्रयत्न असायचा. मात्र, अशा फाळकूट दादांना पोलिसांनी चाप लावला. रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले. त्यामुळे हे भूतही अनेकांच्या मानगुटीवरून उतरले.मध्यंतरी शहरात टोळीयुद्धाच्या घटना घडल्या. त्यामुळे पोलीस आक्रमक झाले. भल्याभल्या ‘दादा’, ‘भार्इं’ना पोलिसांनी तुरुंगाची हवा खायला लावली. तसेच गल्लीबोळात चुळबूळ करणाºयांवरही ‘वॉच’ ठेवला. त्यामुळे फक्त स्वत:चा ‘भाव’ वाढविण्यासाठी ‘कॉलर टाईट’ करणारांची पंचाईत झाली. ‘भाई’ म्हणवून घ्यायला कोणताच मार्ग सापडत नसताना काहींनी युवकांचे ग्रुप तयार करण्यास सुरुवात केली. या ग्रुपद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा डावही आखला गेला. मात्र, पोलिसांनी काही टोळ्यांवर ‘मोक्का’चा फास आवळायला सुरुवात केली की, असे ‘ग्रुप’ही फुटायला लागले. युवक ग्रुपमधून बाहेर पडले. त्यामुळे ‘दादा’, ‘भाई’, ‘डॉन’ पुन्हा एकटे पडले.कºहाड हे संवेदनशील शहर. येथे ठिणगीचा भडका कधी होईल, हे सांगणे कठीण. त्यामुळे गुंडगिरीला संधीच न देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय. मात्र, पोलिसांना चकवा देत काहींनी सध्या सवता सुभा मांडलाय.कायद्याच्या कचाट्यात न सापडता भाईगिरी करण्याचा ते प्रयत्न करताना दिसून येतायत. त्यासाठी चित्रविचित्र फोटोंचे ‘स्लाईड शो’ तयार करून ते इंटरनेटवर ‘अपलोड’ केले जातायत. अशा ‘स्लाईडशो’ना ‘कॅप्शन’ही तशीच भन्नाटदिली जात असून, त्याद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अनलाईक करना मना है!सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओसोबत कॅप्शन असतात. एका व्हिडीओच्या कॅप्शनला तर ‘अनलाईक करना मना है’ अशा आशयाचे धमकीदायक कॅप्शन दिलं गेलंय. वास्तविक, अशा व्हिडीओंना ‘लाईक’ शेकडोत तर ‘अनलाईक’ एकही नसल्याचं पाहायला मिळतं. भीती हे त्यामागचं कारण असावं.‘बर्थ डे’ ठरतोय निमित्त..व्हिडीओ तयार करण्यासाठी ‘बर्थ डे’चं निमित्त शोधलं जातंय. बर्थ डेच्या शुभेच्छा देण्याबरोबरच ‘मिक्सिंग’ करून दहशतपूर्ण व्हिडीओ बनविण्याकडे अनेकांचा कल आहे. ही दहशत फोटोतील हावभाव, शस्त्र, गाणी, डायलॉगद्वारे दिसून येते.भाई बोले तो...!वेगवेगळ्या ‘सॉफ्टवेअर’ आणि ‘अ‍ॅप्लिकेशन’वर तयार केल्या जाणाºया ‘स्लाईड शो’मध्ये संबंधितांकडून फिल्मी ‘डायलॉग’ टाकले जातायत. तसेच गोळीबार, तलवार, वादळाचे आवाज टाकून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही केला गेलाय. हे डायलॉग आणि आवाज भीतीदायक असेच आहेत.कट्टा, तलवार, चाकूही...सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहिल्यास अनेक व्हिडीओंमध्ये शस्त्रांचे फोटो टाकण्यात आल्याचे दिसते. काही व्हिडीओमध्ये बंदूक, गावठी कट्टा, पिस्तूल यासारखी शस्त्र आहेत. तर काही व्हिडीओमध्ये काडतुसे. काहींमध्ये तलवार. तर काहींमध्ये चाकूसारख्या धारदार शस्त्राच्या फोटोंचा वापर केला गेलाय.