शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गाईला गळफास बसला म्हणून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 14, 2016 00:37 IST

सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथील घटना

सातारा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वीस किलोच्या घणाने दगड फोडणारे हात लाडक्या गायीचा प्राण वाचवू शकले नाहीत. जीवापाड जपलेल्या गायीचा फास लागल्याने मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने जावळी तालुक्यातील मुनावळे येथील सत्तर वर्षीय कोंडिबा कृष्णा पवार यांनी शुक्रवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंडिबा पवार मुनावळे येथे आपली पत्नी अनुसया आणि दोन मुलांबरोबर राहत होते. त्यांचा एक मुलगा मुंबईला असतो तर दुसरा मुलगा त्यांच्याबरोबरच शेतीत काम करतो. कोंडिबा यांना शहरीकरण कधीच आवडले नाही म्हणूनच कधी औषधोपचारासाठीही त्यांनी शहरात पाय ठेवला नाही. गावाकडे उपलब्ध असणाऱ्या वनौषधी हेच त्यांचे उपचार होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे दगड फोडून त्यांनी पोर बाळं जगवली. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून पशुधन सांभाळणे ही त्यांची परिसरातील खास ओळख. पवार यांची लाडकी गाय गाभण राहिली होती. पित्याच्या हृदयाने पवार तिच्याकडे लक्ष देत होते. गुरुवारी रात्रीचे जेवण उरकल्यानंतर ते सवयीप्रमाणे वस्ती जवळील रानात गोठ्यामध्ये झोपायला गेले. तेथे त्यांना दोराला हिसके देऊन देऊन गाय मृत्युमुखी पडल्याचे दिसले. हा धक्का सहन न झाल्याने गोठ्या शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडाला फास घेऊन आत्महत्या केली. रोज सकाळी सहा वाजता पवार गावातील घरी येत असत. शुक्रवारी ते न आल्याने घरातील थोडे काळजीत होते; मात्र शेतात गवारी तोडत असतील, असा समज करून कोणीच गोठ्याकडे फिरकले नाहीत. गावातील ग्रामस्थाने पवार यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना कळवले. त्यानंतर सर्वांनीच वस्तीकडे धाव घेतली. गोठ्यात ज्या पद्धतीने गायीचा मृत्यू झाला होता, त्याच पद्धतीने पवार यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)