शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर पुन्हा तापतंय रान!

By admin | Updated: November 2, 2014 23:32 IST

निष्क्रिय कोण? : पाटण तालुक्यात आजी-माजी आमदारांची जुगलबंदी

पाटण : पाटणच्या जनतेने फैसला केल्यानंतर तालुक्यातील नेत्यांचा श्रेयवाद विसरून जाईल, अशी अपेक्षा असतानाच दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांविरोधात दंड थोपटले आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये जुगलबंदी पाहण्यास मिळत आहे.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना सामोरे जाताना विक्रमसिंह पाटणकर यांनी पुढील पाच वर्षे निष्क्रियतेचा अनुभव जनतेला येईल, असा टोला नूतन आमदार शंभूराज देसाई यांना लगावला होता. त्याचे उत्तर देताना आमदार पाटणकर हे किती निष्क्रिय होते, याचा निकाल जनतेने साडेबत्तीस पटीने दिला आहे,’ असे प्रतिउत्तर दिले. त्यामुळे पाटण तालुक्यात सध्या निष्क्रियतेची ऐशी की तैसी सुरू आहे.माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी २६ वर्षे पाटण तालुक्यावर अधिराज्य गाजविले. त्याच पाच वर्षे राज्याचे बांधकाममंत्री होते, तर तालुक्यातील सहकारी संस्थांचे जाळे पाटणकरांच्या हाताशी. याउलट पाच वर्षे आमदार आणि साखर कारखाना जवळपास त्यांच्याच अशा स्थिती विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांची होती. आता निवडणूक झाली आहे. निकाल लागला आहे. तरीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांना निष्क्रिय ठरविण्यात वेळ घालविणे पसंत केले आहे. पाटण तालुक्याचा न झालेल्या विकास आणि जनतेच्या जीवनमानात राहून गेलेला मागासलेपणा यातूनच निष्क्रियतेचा ठपका लागू होतो. हे कोणीही नाकारू शकत नाही. मग निष्क्रियतेचे बोट दाखविताना इतर चार बोटे आपल्याकडे वळली आहेत, हे नेत्यांच्या कदाचित स्मरणात नाही. तेव्हा यापुढे तरी कोण निष्क्रिय आणि कोण सक्रिय याचा हिशोब न मांडता दोन्ही नेत्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून कर्तृत्व सिद्ध करून दाखविण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या पाच वर्षांनंतर पाटणची जनता निष्क्रिय नेत्यांचा पंचनामा करायला सज्ज आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आज वादावादीत अडकून राहण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)