शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

धावडवाडी गाव सभापतींकडून दत्तक

By admin | Updated: November 17, 2014 23:25 IST

गावात अभियान राबविताना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. पदाधिकाऱ्यांचे सहकार्य

खंडाळा : ‘स्वच्छता मोहिमेमुळे गावाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेबरोबच वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ठ शंभर टक्के पूर्ण करावे. केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता न करता ती सातत्याने राखली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर प्रत्येकाने सामाजिक भूमिकेतून काम करावे,’ असे मत सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी धावडवाडी हे गाव दत्तक घेतले आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रारंभाची आढावा बैठक खंडाळा येथे किसन वीर सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, उपसभापती सारिका माने, जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे, दीपाली साळुंखे, अनिता शेळके, गटविकास अधिकारी विालस साबळे, गटशिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, बालविकास अधिकारी एस. एम. सोनावणे उपस्थित होते.‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत गावपातळीवर नेमून दिलेल्या आराखड्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, शौचालयांसह गावचा परिसर, शालेय परिसर, गटार व्यवस्था, पाण्याच्या सुविधा, आरोग्य सुविधा याबाबतीत योग्य नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. तालुका पातळीवरील प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे कामकाज दिले असून, सर्वांना दक्षपणे राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक गावात अभियान राबविताना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. सर्व गावांसाठी पदाधिकाऱ्यांचे पूर्णत: सहकार्य राहील, असे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) खंडाळा येथे स्वच्छ भारत अभियानाच्या बैठकीत स्वच्छेतेची शपथ घेताना रमेश धायगुडे-पाटील, रवींद्र खेबुडकर, शिवाजी तळपे, सारिका माने आदी.