शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

सातारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेला यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्णसंख्या कमी होईल. जिल्ह्यात ...

सातारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेला यश येत असून नागरिकांनी जर नियम पाळले तर रुग्णसंख्या कमी होईल. जिल्ह्यात अजून जे निर्बंध लागू आहेत ते देखील उठण्याच्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु लोकांनी त्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. आता दर शुक्रवारी परिस्थिती बघून आदेश काढले जातील, असे स्पष्टीकरण जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

सातारा जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची घटलेली टक्केवारी ही नैसर्गिक आहे. जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत शनिवार ते शुक्रवार अशी आकडेवारी संकलित करून जिल्ह्याच्या संक्रमणाची प्रतवारी निश्चित होणार आहे . तिसऱ्या लाटेचे संक्रमण उद्भवू नये यासाठी सातारकरांनी कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होऊ नये याकरिता सातारा, कराड, फलटण, वाई या चार तालुक्यांत लहान मुलांसाठी तीस ऑक्सिजन बेडची विशेष रुग्णालये उभारली जात आहेत . यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत माझे मूल माझी जवाबदारी या योजनेचा शुभारंभ येत्या शुक्रवारपासून येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे शेखरसिंह यांनी स्पष्ट केले .

सातारा जिल्ह्यात कोरोना संक्रमण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना जिल्हाधिकारी शेखरसिंह पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणे ही सातारा जिल्हावासीयांची जबाबदारी आहे. जिल्ह्यात संक्रमणाची टक्केवारी सध्या ९.७५ टक्के असून ती पूर्णतः नैसर्गिक आहे. सर्व आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या आकडेवारीचे काटेकोर संकलन केले जात आहे. जिल्हा विशेष समितीच्या बैठकीत दर आठवड्याला शनिवार ते शुकवार अशा आकडेवारीचे शास्त्रीय संकलन करून संक्रमणाची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे. सातारकरांनी कोरोनाची तिसरी लाट उद्भवू नये याकरिता सामाईक अंतर राखणे, विनाकारण गर्दी न करणे या उपाययोजनांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

लसीकरणासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ५८१ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून, जिल्ह्यात एकूण ५६ टक्के लसीकरण झाले आहे. केंद्र शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे खाजगी दवाखान्यांमध्ये सुध्दा दीडशे रुपयांच्या नाममात्र शुल्कात लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात आयसीयू व ऑक्सिजन बेडची क्षमता पाच हजारांपर्यंत वाढविणे, जिल्ह्याची ४८ मेट्रिक टन ऑक्सिजनची पूर्तता करणारे ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे, कॉन्स्ट्रेटरचा मुबलक पुरवठा ठेवणे, इ उपाययोजना युद्धपातळीवर राबविले जात असून, बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या सूचनेप्रमाणे ० ते २ बालकांसाठी मास्क न वापरणे, २ ते ५ वयोगटाच्या बालकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करणे, व ५ वर्षांपुढील बालकांना मास्कची सक्ती करणे ही नीती अवलंबिली जाणार असून, त्या पध्दतीने पालकांना समुपदेशन करणाऱ्या चित्रफिती प्रदर्शित केल्या जाणार आहेत. बालकांची विशेष हॉस्पिटल्स ही अंगणवाडीच्या धर्तीवर विकसित करताना येथील वातावरण हलकेफुलके ठेवणेकरिता बालरोगतज्ज्ञांचा विशेष सल्ला घेतला जाणार आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

१ . राष्ट्रीय आरोग्य समितीच्या दौऱ्यासाठी जंबो हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजचा फलक

२ . शाळा शुल्कच्या संदर्भात पालक संघांशी व शाळा व्यवस्थापनांशी चर्चा

३ . भटक्या जमातीच्या लसीकरणासाठी मोबाइल वॅक्सिनेशन

४ . लहान मुलांची हॉस्पिटल्स ऑन बोर्ड घेणार

५ लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांचा विशेष टास्क फोर्स