शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

२४० वाहनांवर कारवाई

By admin | Updated: November 5, 2014 00:02 IST

वाहतूक शाखा : दोन दिवस विशेष मोहीम राबवून २५ हजारांचा दंड वसूल

सातारा : शहर व परिसरातील चेन स्नॅचिंग, वाहन चोरी तसेच भरधाव वाहन चालविणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी वाहतूक शाखेने सलग दोन दिवस अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी तब्बल दोनशे चाळीस वाहनांवर कारवाई करून वाहनचालकांकडून २५ हजार दंड वाहतूक शाखेने वसूल केला.सातारा शहरामध्ये वेगात वाहन चालविणाऱ्या रोडरोमीओंचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: सायंकाळच्या सुमारास राजवाड्याहून पोवईनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या राजपथावर हे प्रकार नेहमीच घडत आहेत. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याकडे तक्रारींचा ओघ वाढला. त्यामुळे कानगुडे यांनी शहरात वाहनांची अचानक तपासणी मोहिम राबविली.या मोहिमेध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे यांच्यासह दोन अधिकारी व १४ कर्मचारी सहभागी झाले होते. शहरामध्ये दर आठवड्याला अचानकपणे ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे श्रीगणेश कानुुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)युवकांवर लक्ष केंद्रितपोवईनाका, विसावानाका, बसस्थानक, राजवाडा, रविवार पेठ, कमानी हौद, राधिका चौक, मोळाचा ओढा या परिसरांचा त्यामध्ये समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरी व मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या मोहिमेला विशेष महत्व आहे. सकाळी ११ ते एक व सायंकाळी चार ते आठ या वेळेत ही तपासणी करण्यात आली. यामध्ये युवक वर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. नंबर प्लेट नसणे, चुकीच्या पद्धतीने नंबरप्लेट लावणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वेगात वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या. दोन दिवसांत तब्बल ८५० वाहने तपासण्यात आली. त्यातील २४० जणांवर कारवाई करण्यात आली. तर २५ हजार रुपये दंड वसूल झाला.