शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी विरेंद्र तावडेही साताऱ्याचाच!

By admin | Updated: June 12, 2016 00:31 IST

दाभोलकर हत्या प्रकरण : ‘गणपती दान’ चळवळीला केला होता कडाडून विरोध

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी डॉ. विरेंद्र तावडे हा मूळचा साताऱ्याचाच असून, दहा वर्षांपूर्वी दाभोलकरांनी साताऱ्याच्या तळ्यांवर राबविलेल्या ‘गणपती दान’ चळवळीला कडाडून विरोध करण्यात या विरेंद्रचा किती सहभाग होता, याचीही चौकशी आता ‘सीबीआय’ने सुरु केल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आलीय. दाभोलकर हत्या प्रकरणाचा कसोशीने तपास करणारी ‘सीबीआय’ आता साताऱ्यातील दहा वर्षांपूर्वीच्या त्या वादग्रस्त घटनांचा शोध घेत असून, आरोपीच्या डोक्यात तेव्हापासूनच ‘दाभोलकर द्वेष’ होता की काय, याचीही चाचपणी सुरू केलीय. विरेंद्रचे शिक्षण जरी मुंबईत झाले असले तरी त्याचे बहुतांश नातेवाईक आजही साताऱ्यातच आहेत. उच्च शिक्षणानंतर विरेंद्रने ‘निधी’ नामक पंजाबी तरुणीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघांनीही नोकरीसाठी साताऱ्यातच आसरा घेतला होता. दहा वर्षांपूर्वी सातारा येथील ‘चिरायु’ हॉस्पिटलमध्ये निधी तावडे ‘बालरोगतज्ज्ञ’ म्हणून काम करत असताना तिची पत्नी डॉ. चित्रा नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ओळखही झाली होती. साताऱ्यात असताना पत्नी कमवत असली तरी विरेंद्र मात्र तेव्हापासूनच ‘जनजागृती’सारख्या संस्थांशी निगडीत होता. खर्च झेपेना म्हणून अखेर या पती-पत्नीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. विरेंद्रचे काका आजही साताऱ्यातच ! विरेंद्रचे काका गेल्या अनेक दशकांपासून साताऱ्यातील जुने जाणते कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. विरेंद्र दाम्पत्याला साताऱ्यातच स्थिर करण्यासाठी या डॉक्टर काकांनीही खूप प्रयत्न केले होते. मात्र, डोक्यात काहीतरी वेगळ्याच कल्पना असणाऱ्या विरेंद्रने अखेर संस्थेचे कार्य अधिकाधिक व्यवस्थित करता यावे, यासाठी डॉक्टरी पेशाकडेही दुर्लक्ष केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.(प्रतिनिधी)