शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अख्खं रुग्णालय धावलं वृद्धेच्या मदतीला-- लोकमतचा प्रभाव

By admin | Updated: December 25, 2014 00:13 IST

शल्यचिकित्सक संतप्त : पैसे मागणाऱ्या ‘त्या’ रुग्णवाहिका चालकाची चौकशी सुरू

सातारा : रुग्णवाहिकेअभावी आपल्या आजारी आईला स्ट्रेचरवरून घेऊन जाताना एका हतबल गरीब मुलाला अर्धा किलोमीटर रस्त्यावर प्रचंड कसरत करावी लागली, याचा वृत्तांत ‘लोकमत’मध्ये आज, बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खं जिल्हा रुग्णालय त्या वृद्धेच्या मदतीसाठी धावलं. आजारी वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेण्यास नकार देणाऱ्या चालकाच्या चौकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिले आहेत.शांता बापूराव घाडगे (वय ७०, रा. फत्त्यापूर, ता. सातारा) या पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, पायाचा एक्स-रे काढण्याचा सल्ला रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या मुलाला दिला.एक्स-रे काढण्यासाठी रुग्णालयात कोणतीही सोय नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. रुग्णवाहिका चालकाने पैसे मागितल्याने मुलाने आईला स्ट्रेचरवर घेऊन खासगी रुग्णालय गाठले होते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. काल, मंगळवारी सकाळपासून शांता घाडगेंवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची रीघ लागली. वॉर्डमधील परिचारिकाही त्यांच्याशी चांगल्या बोलू लागल्या. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे. घाडगे यांच्या नातेवाइकांनीही त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या आईची प्रकृती आता चांगली असल्याचेही घाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘रुग्णांना तातडीने योग्य सुविधा द्या. कोणाचीही तक्रार येता कामा नये,’ अशा शब्दांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली. तसेच संबंधित रुग्णवाहिका चालकाची खातेअंतर्गत चौकशीही सुरू केली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.माझ्या आईच्या बाबतीत जसा प्रसंग ओढावला, तसे कोणाच्याही बाबतीत होऊ नये.- रवींद्र घाडगे