शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी जिल्ह्यात ९३० बसेस

By admin | Updated: October 12, 2014 00:42 IST

विधानसभा निवडणूक : जिल्हा निवडणूक कार्यालयाने तीन दिवसांसाठी केली गाड्यांची नोंद

सातारा : लोकसभा, विधानसभा निवडणुका म्हणजे जणू लोकशाहीचा उत्सवच असतो. राज्याच्या कारभाराची चावी ज्यांच्या हाती देणार आहेत, तो मतदानाचा दिवस निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीनुसार तीन दिवसांत ९३० एसटी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार, दि. १५ रोजी मतदान होत आहे. पण, ही प्रक्रिया शासकीय पातळीवर तीन दिवस चालणार आहे. निवडणुकीचे साहित्य महाबळेश्वर, पाटण, जावळी खोऱ्यातून दुर्गम भागात पोहोचविण्याचे काम आजवर एसटीने चोखपणे पार पाडले आहे. निवडणूक कार्यालयाने केलेल्या मागणीनुसार एसटी पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी दिली.सोमवार, दि. १३ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी सोडण्यासाठी जिल्ह्यात अडीचशे गाड्या वापरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा ४४, कऱ्हाड ४५, फलटण ३९, वाई ४७, दहिवडी ४५, पाटण येथे ३० गाड्या वापरण्यात येणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवार, दि. १४ रोजी निवडणूक कर्मचारी व मतदान यंत्रणा मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी व पुन्हा मतदानानंतर मतदान साहित्य तालुक्याच्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी दररोज ३४० असे ६८० गाड्यांचा वापर केला जाणार आहे. यामध्ये सातारा ३१, कऱ्हाड ८३, कोरेगाव ४५, फलटण ४२, पाटण ४१, वाई ५८, दहिवडीतून ४१ गाड्यांचा समावेश आहे. कोयना जलाशयाच्या पलीकडे व नदीच्या पलीकडील भागात साहित्य पोहोचविण्यासाठी बोटींचाही वापर केला जाणार आहे. दरम्यान, मतदानानंतर सायंकाळी कर्मचारी व साहित्य घेऊन एसटी गाड्या संबंधित तहसील कार्यालयात जाणार आहेत. त्यानंतर साहित्य जमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू शकते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गावी जाताना अडचणी येणार आहेत. कारण, निवडणूक कर्मचारी विविध भागांतील असणार आहेत. आणि रात्री उशिरानंतर त्यांना सोय होणार नाही, त्यामुळे योग्य ती सोय करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)