मलकापूर : शहरात गत तीन महिन्यात केवळ ७२ तर गत सात दिवसात ४४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी दोन दिवसात २४ बाधित आढळले असून एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण १ हजार २०२ बाधित झाले. त्यापैकी १ हजार १२१ जणांनी कोरोनावर मात केली तर ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मलकापुरात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात बाधितांचा आकडा कमी झाला होता. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन केल्यामुळे व उपचाराने एक महिन्यातच शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जून २०२० रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात तर कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्यात त्यामध्ये घट झाली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २-३ जण बाधित येत होते. तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित आढळले. महिन्यात काहीवेळेला आठ-आठ दिवस एकही रुग्ण आढळला नाही. तर एकही मृत्यू झाला नाही.
डिसेंबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. जानेवारी महिन्यात पुन्हा वाढ होत गेली. १५ जण पॉझिटिव्ह आले. फेब्रुवारीमध्ये १९ तर मार्च महिन्यात २५ दिवसात ३४ रुग्ण वाढले. गत सात दिवसात तब्बल ४४ बाधित सापडले आहेत.
- चौकट
... असे वाढले रुग्ण
१) २२ एप्रिल ते २४ मे : ३१
२) २५ मे ते २५ जून : ०
३) २६ जून ते २६ जुलै : ४३
४) २७ जुलै ते २६ ऑगस्ट : ३३८
५) २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर : ४२८
६) २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबरला : १५९
७) २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर : ६९
८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर : १८
९) ३१ डिसेंबर ते ३० जानेवारी : १५
१०) ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी : १९
११) १ मार्च ते २५ मार्च : ३३
१२) २६ मार्च ते २ एप्रिल : ४४
- चौकट
मलकापूर लेखाजोखा
एकूण बाधित : १२०२
दुर्दैवी मृत्यू : ३८
कोरोनामुक्त : ११२१
उपचारात : ४३
रुग्णालयात : ९
होम आयसोलेट : ३४
- चौकट
सरासरी
कोरोनामुक्ती : ९३.२ टक्के
मृत्युदर : ३.१ टक्के
अॅक्टिव्ह रुग्ण : ३.७ टक्के