शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

कराड खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कराड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ ...

कराड

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कराड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी ७ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या शिफारशीने सातारा लोकसभा मतदारसंघातील एकूण ३७ रस्‍त्‍यांचा प्रस्‍ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मसूर ते निगडी या ६.९७ कि.मी. रस्‍त्‍यासाठी ४ कोटी ४० लाख ८३ हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण या ४.१९ कि.मी. रस्‍त्‍यासाठी २ कोटी ७५ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात २५ डिसेंबर २००० साली झाली होती. या योजनेचा मुख्‍य उद्देश ग्रामीण भागातील ५०० च्‍या वर लोकसंख्या असणारी गावे मुख्‍य रस्त्‍यास जोडणे हा होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून तत्‍कालीन कराड लोकसभा मतदारसंघातील वाडीवस्तीवर या योजनेखाली मोठ्या प्रमाणात निधी आणण्‍यात यश मिळाले होते.

सध्याच्या योजनेत ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल यांना जोडणारे जे रस्‍ते आहेत अशा रस्‍त्‍यांना गुणांकन देऊन प्राधान्‍यक्रम दिला जातो. योजनेत समाविष्ट रस्त्‍यांना मिळणाऱ्या एकूण निधीत पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्‍तीसह निधीचा समावेश केला गेला आहे. तसेच ज्‍या रस्‍त्‍यावर गरज आहे तिथे १५० मीटर लांबीच्या पुलांचा समावेशदेखील करण्‍यात आला आहे. या योजनेचे कार्यान्वयन राज्‍य शासनाच्‍या ग्रामीण विकास विभागाकडून होते. तसेच या योजनेच्या तिसऱ्या फेजमधील कालावधी २०१९-२० ते २०२४-२५ पर्यंत निर्धारित केला गेला आहे.

श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीनुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांतील एकूण ३७ रस्‍त्यांचा प्रस्‍ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यापैकी कराड तालुक्‍यातील मसूर–वाण्‍याचीवाडी-हणबरवाडी - निगडी या ६.९७ कि.मी.च्‍या रस्‍त्‍यासाठी ४ कोटी ४० लक्ष ८३ हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण (प्रजिमा ५६) या ४.१९ कि.मी. रस्‍त्‍यासाठी २ कोटी ७५ लाख ९९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, तर प्रधानमंत्री ग्रामसडकचे कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, उपकार्यकारी अभियंता विलास पानस्‍कर, कराडचे शाखा अभियंता विजय जाधव यांचे प्रशासकीय कार्यवाहीसाठी सहकार्य लाभले.