शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ४९७ रेमडेसिविर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता जिल्ह्याला तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीच्या काळामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता जिल्ह्याला तब्बल ४९७ इंजेक्शन शासनाच्या माध्यमातून मिळाली असून, त्यांचे वितरण प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालयांना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळावे, यासाठी अनेक स्टॉकिस्टकडे मागणी करीत होते. रेमडेसिविरचा काळा बाजारदेखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही जण हे इंजेक्शन जादा दराने विक्री करीत होते. कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचविण्यामध्ये अत्यंत उपयुक्त असे इंजेक्शन पुरवठ्याअभावी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसत होती. तसेच रुग्णांचे नातेवाईकदेखील विविध ठिकाणी जाऊन रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल का, याची चौकशी करीत होते. प्रशासनाकडेही त्याबाबतची मागणी वारंवार केली जात होती. आता ही गैरसोय दूर होणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत असलेल्या जिल्ह्यातील ४३ रुग्णालयांसाठी गेल्या दोन दिवसांमध्ये ४९७ रेमडेसिविर इंजेक्शन अधिकृत वितरक सनी फार्मा यांच्याकडे पाठवून दिले आहेत. संबंधित रुग्णालयांनी या वितरकाकडून शासनाने ठरवून दिलेल्या किमतीमध्ये हे इंजेक्शन घेऊन जायचे आहे.

केंद्र शासनाच्या इंजेक्शनच्या वापराबाबतच्या सूचना आहेत, त्यानुसार अत्यावश्यक रुग्णांकरिता याचा वापर करावा, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर वैद्यकीय व्यवसायिकांनी सर्रास करू नये, रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यापूर्वी शासकीय विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात यावा. संबंधित रुग्णास मेडिकल स्टोअरमध्ये विक्री करण्यात यावी.

गैरवापर आढळून आल्यास कारवाई

इंजेक्शनचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर व विक्रीबाबतची कागदपत्रे जपून ठेवण्यात यावीत, तसेच या कार्यालयाच्या अधिकारी यांना तपासणीवेळी ती सादर करावीत. वर नमूद केलेल्या रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर अंतिम रकान्यात नमूद केलेल्या संख्येनुसार सनी फार्मा सातारा या वितरकांकडून इंजेक्शनची खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.