शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवड बेकायदेशीर गौणखनिज उपसाप्रकरणी ४८ लाखांचा दंड!

By admin | Updated: June 28, 2016 00:35 IST

बाजारतळ काम : माणगंगा नदीतून मुरूम उचलल्याचा होता आरोप

दहीवडी : म्हसवड बाजारपटांगणाच्या काँक्रिटीकरणासाठी माणगंगा नदीतून बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला स्थानि क प्रशासनाकडून ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला. येथील सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. मात्र, ‘हे काम कागदोपत्री युनिक बिल्डर्स (माळेवाडी, अकलूज) यांच्या नावे नामधारी असून, ते काम प्रत्यक्षात आमदार समर्थक व माजी नगराध्यक्ष विजय धट हे करत आहेत. या कामासाठी लागणारी खडी, डबर वाळू व मुरूम हे गौणखनिज बेकायदेशीररीत्या माणगंगा नदीच्या पात्रातून रॉयल्टी न भरताच उचलले गेले आहे, ’अशी तक्रार ‘शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान’चे सदस्य संग्राम शेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदार माण यांनी गावकामगार तलाठी म्हसवड यांना या कामाचा पंचनामा करून माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांचेकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार तहसीलदार माने यांनी म्हसवड बाजारपटांगण काँक्रिटीकरणासाठी बेकायदेशीर गौणखनिज वापर केल्यामुळे ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची आकारणी केलीे.६५० ब्रास डबर, ८० ब्रास वाळू व मुरूम, १५० ब्रास खडी असे गौणखनिज रॉयल्टी न भरताच वापरले असल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.याबाबत काढलेल्या पत्रकात संग्राम शेटे म्हणाले की, ‘खंडणीखोर नेता कोण व खंडणीबहाद्दर भुरटे कार्यकर्ते कोण, हे माण-खटावच्या जनतेला आता चांगलेच माहीत झाले आहे. मौजे पळसावडे येथील एका पॉवर सोलर ऊर्जेच्या अधिकाऱ्यांकडून कोणाला खंडणी पाहिजे होती म्हणून काम बंद करायला लावले होते. कोणाचे भुरटे खंडणी बहाद्दर कार्यकर्ते कशासाठी टाटा पॉवरला खंडणी मागत होते?, हे सर्व माण-खटावच्या जनतेला माहीत आहे.मला कामाच्या दर्जाबाबत कळत नाही, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी स्वत: इंजिनिअर आहेत का? माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी शासनाच्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत म्हसवडकर जनतेपुढे त्या कामाचा दर्जा, अंदाजपत्रकाप्रमाणे काम आहे का ते पाहावे आणि मग माझ्यावर खंडणीचे आरोप करावेत, असेही शेटे शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)गफला झाला नाही ; मग दंड कसा? : शेटे‘कामाच्या दर्जाबद्दल कदाचित आम्हाला कळत नसेल, परंतु रॉयल्टी न भरता चोऱ्या कोण करतंय व त्यांना पाठीशी कोण घालतंय हे जागरूक नागरिकाला समजले तरी पुरेसे आहे. बाजारपटांगण काँक्रिटीकरणाच्या कामात जर काही गफलाच झाला नव्हता तर ४८ लाख ५२ हजार ३०० रुपये दंडाची कारवाई कशी झाली. मी तक्रार करून खंडणी गोळा करतो हे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. मी केलेल्या तक्रारींमुळे तुमचे व कार्यकर्त्यांचे पितळ उघडे पडले म्हणून खंडणीचा आरोप केला जात आहे,’ असे संग्राम शेटे यांनी पत्रकात म्हटल आहे. २००९ पासूनचा सर्वच सात-बारा बाहेर काढू ...माण-खटावची जनता दूधखुळी राहिलेली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करावे, ‘कोंबडं झाकलं म्हणजे तांबडं फुटायचं राहत नाही,’ हे लक्षात ठेवावे. खंडणीचा आरोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एवढेच सांगणे आहे की, २००९ पासूनचा सर्वच सात-बारा काढावा लागेल म्हणजे नवलेवाडी-रामोसवाडी सारखे आणखी किती रस्ते व इतर विकास कामे चोरीस गेली आहेत, हे कळेल, असा गर्भित इशाराही शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे संग्राम शेटे यांनी दिला आहे.