शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नवजाला ३४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात २० दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पण, गुरुवारपासून तुरळक प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात २० दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पण, गुरुवारपासून तुरळक प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच कोयनेसह महाबळेश्वरलाही पावसाने हजेरी लावली. पूर्व भागात तुरळक पाऊस झाला.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करुन पश्चिम भागात धुवाधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबलेली. धरणातही पाण्याची आवक कमी होत होती. पण, गुरुवारपासून पुन्हा जिल्ह्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९ मिलिमीटर पाऊस झाला, तर जूनपासून कोयनानगरला ९५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ३४ व आतापर्यंत ११४९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला १० आणि जूनपासून १२९९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.३५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. तर १२३४ क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद आहे.

दरम्यान, सातारा शहर व परिसरात बुधवारी आणि गुरुवारी पावसाने चांगली हजेरी लावली. पण, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर पूर्व भागात काही ठिकाणी अल्प पाऊस झाला.