शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात २३ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्यात २३ कोरोना बाधितांना सोमवारी जीव गमवावा लागला. ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ...

सातारा : जिल्ह्यात २३ कोरोना बाधितांना सोमवारी जीव गमवावा लागला. ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने चाचण्यांची संख्या वाढविल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्यादेखील वाढलेली दिसत आहे.

जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेल्या बाधित यांची संख्या ५ हजाराकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. मंगळवारी अचानकपणे मृत्यूची संख्या वाढली. तब्बल २३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ९४० झाली असून, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील पुन्हा वाढल्याचे चित्र असून, आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. कऱ्हाड, सातारा, फलटण या तालुक्यांमध्ये रुग्णांचे मृत्यू वाढले. सातारा तालुक्यात ६, कऱ्हाडात ५, फलटणमध्ये ४, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, पाटण या तालुक्‍यात प्रत्येकी १, कोरेगाव व माण तालुक्यातील प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला. जावळी व वाई या तालुक्यात मृत्यूची नोंद झाली नाही. सातारा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २६० मृत्यू झाले. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यात ९२५ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

कऱ्हाड तालुक्‍यातील रुग्णांची संख्या मंगळवारी पुन्हा वाढली. तालुक्यातील ३१६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्याखालोखाल सातारा तालुक्यातील १७१ रुग्ण आढळून आले असून, फलटण, कोरेगाव या तालुक्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४ हजार ४२७ इतकी झालेली आहे.

सातारा तालुक्यामध्ये सर्वाधिक ४२ हजार ४६५ इतकी रुग्णसंख्या झालेली आहे. कऱ्हाड तालुक्यातील रुग्णसंख्या कमी वेळेत झपाट्याने वाढली. या तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९३ झाली आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत ६७६ जणांना घरी सोडण्यात आले. विविध रुग्णालयांमध्ये १० हजार ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

१२ लाखांच्यावर लोकांचे नमुने तपासले

सातारा जिल्ह्यामध्ये १२ लाख १ हजार ५०७ लोकांचे नमुने तपासण्यात आले, यातून २ लाख ४ हजार ४२७ लोक बाधित आढळले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणदेखील जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९१ हजार १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना वाढीचा दर ७ टक्क्यावर..

जिल्ह्यात दोन दिवसापासून कोरोना वाढीचा दर अचानकपणे खाली आला. साडेसोळा टक्‍क्‍यावर पोहोचलेला वाढीचा दर दोन दिवसात साडेसहा टक्क्यावर आला होता. मंगळवारी पुन्हा थोडी वाढ झाली. कोरोना वाढीचा दर सात टक्के झाला.