शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

२१७२ मतदार मतदानापासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचे असताना निवडणूक आयोगाची डोळेझाक या मतदारांवर मतदानाच्या हक्कावर एकप्रकारे ...

वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचे असताना निवडणूक आयोगाची डोळेझाक या मतदारांवर मतदानाच्या हक्कावर एकप्रकारे गदा आणत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी या राष्ट्रीय व उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या कर्मचारी मतदारांवर आजअखेर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणतीच ठोस पावले उचलली नसल्याने त्यांच्या हक्कावर एकप्रकारे अन्यायच केला जात आहे.

खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्य व राज्याबाहेरील मतदार यांची धडपड सर्वश्रूत आहे. मात्र, या मतदानाच्या हक्कासाठी धडपडणाऱ्या मतदारांवर नेहमीच अन्याय होत आहे. खटाव तालुक्याच्या त्रिभाजनात विखुरलेल्या मतदारांची नेहमीच अवहेलना होत आहे. तालुक्याचे तीन मतदारसंघांत झालेले त्रिभाजन यामुळे मतदानाचा हक्क बजावताना मतदाराला आर्थिक नुकसान होऊन देखील मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही बाब लोकशाहीतील फार मोठी खेदजनक घटनाच म्हणावी लागेल. याबाबत वारंवार तक्रारी होऊन देखील निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही, ही बाब लोकशाहीतील सर्वांत मोठी लांच्छनास्पद घटना आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची योजना वाखाणण्याजोगी असली तरी मतदार मतदानापासून वंचित राहतोय याबाबतची उदासीनता दिसून येत आहे.

चौकट..

तालुक्यात यंत्रणा सज्ज..

खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७७ हजार ४२ पुरुष व ७४ हजार १३५ महिला असे एकूण एक लाख ५१ हजार १७७ मतदार आपला हक्क बजावत आहेत. मतदान अधिकारी १४४८, शिपाई कर्मचारी ३६२ व पोलीस कर्मचारी ३६२ अशी नियुक्ती प्रशासनाकडून केली आहे. परंतु याहीवेळी हे मतदार मतदानापासून वंचित राहणार हे स्पष्ट होत आहे.

--------------