शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नवे १५९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गत चोवीस तासांत मंगळवारी नवे १५९ रुग्ण आढळून आले. तसेच यामध्ये एकाही ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गत चोवीस तासांत मंगळवारी नवे १५९ रुग्ण आढळून आले. तसेच यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू न झाल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बाधितांची संख्या ६२ हजार ५८५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत आठवड्यात तीनवेळा तीनशे पार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणखीनच चिंतेत पडले आहे. सोमवारी आलेला १३३ जणांच्या अहवालामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता; मात्र मंगळवारी १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.

गतवर्षी असलेले कोरोनाचे हॉटस्पॉट यावर्षीही कायम आहेत. सातारा आणि फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य पथके ही त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६२ हजार ५८५ इतकी झाली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८८७ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५८ हजार ३३६ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २ हजार ३३२ रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.