शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने १.५५ लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

सातारा : नगर येथील मिलिट्री रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लावतो, असे सांगून १.५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ...

सातारा : नगर येथील मिलिट्री रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लावतो, असे सांगून १.५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. संजय वसंत घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून दुसरा संशयित हा संजय घाडगे याचा मेहुणा असून त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकलेला नाही. दरम्यान, मुलाला अपॉइंटमेट लेटर कधी मिळणार, अशी विचारणा केली म्हणून संशयित संजय घाडगे याने फिर्यादीलाच तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी,

संजय हणमंत बर्गे (वय ५२, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय वसंत घाडगे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांचा मेहुणा (नाव व पत्ता माहीत नाही) याने मी नगर येथील मिलिट्रीच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये कमांडिंग ऑफिसर यांचा पीए असून ‘मी तुमचा मुलगा आकाश याला मिलिट्री रेकॉर्ड ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून भरती करतो,’ असे सांगितले. यानंतर बर्गे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक (पोवई नाका शाखा) आणि कर्नाटक बँकेच्या खात्यातून घाडगे याच्या खात्यावर रोख तसेच एनएफटीद्वारे १.५५ लाख रुपये भरले. यानंतर संजय घाडगे याने त्याच्या मेहुण्याला फोन लावला आणि संजय बर्गे यांना मोबाइल कॉन्फरन्सवर घेऊन ‘तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर पोस्टाने येईल,’ असे सांगितले.

दरम्यान, बरेच दिवस झाले तरी मुलगा आकाश याला अपॉइंटमेंट लेटर न आल्याने त्याची विचारणा संजय बर्गे यांनी संजय घाडगे याला केली. मात्र, घाडगे याने तुम्ही मला येथून पुढे भरतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची विचारणा करून त्रास देऊ नका. मी तुमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यामुळे संजय बर्गे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संजय घाडगे आणि त्याच्या मेहुण्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार मोघा मेचकर या करत आहेत.