शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

१२ जानेवारीला उदयसिंह कोयना बँकेत नव्हते

By admin | Updated: July 30, 2014 23:39 IST

फोन कॉल्सची माहिती न्यायालयात सादर

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून होण्यापूर्वी म्हणजेच १२ जानेवारीला संबंधित अटकेत असलेल्या आरोपींसमवेत उदयसिंह पाटीलला पाहिले असल्याची साक्ष यापूर्वी संभाजी थोरात (रा. कार्वे, ता. कऱ्हाड) यांनी न्यायालयात दिली होती. मात्र, बुधवारी सुनावणीदरम्यान मोबाइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशीचे १२ जानेवारीचे मोबाइल लोकेशन न्यायालयात सादर केले. त्यामध्ये १२ जानेवारीला उदयसिंह पाटील साताऱ्यात असल्याचे निष्पन्न झाले.जिल्हा न्यायालयात आज (बुधवारी) सुनावणीदरम्यान आयडिया कंपनीचे विभागीय अधिकारी दत्ताराम आंगरे आणि एअरटेल कंपनीचे गणेश पवार यांची साक्ष झाली. त्यांनी न्यायालयात सीडीआर रिपोर्ट सादर केले. मोबाइल लोकेशनबाबत दोघांनी न्यायालयात सविस्तर माहिती दिली. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. १२ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता उदयसिंह पाटील, संभाजी पाटील, बाबा मोरे, सलीम शेख, सागर परमार या पाचजणांना कोयना बँकेतून खाली उतरताना मी पाहिले होते, अशी साक्ष संभाजी थोरात यांनी सरकार पक्षाच्या वतीने यापूर्वी दिली होती. परंतु आज न्यायालयात मोबाइल लोकेशचा अहवाल सादर केल्यानंतर १२ जानेवारीला उदयसिंह पाटील साताऱ्यात असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी दिली. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी ५ आॅगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)