शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५ दिवसांत १०८३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता ...

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता एक हजार ८३ रुग्ण आढळून आले असून, २० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू लागली आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा रुग्ण आढळला. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. यामुळे सप्टेंबरअखेर कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ३७ हजारांवर गेली. तसेच मृतांचा आकडाही वाढला.

ऑक्टोबर उजाडताच कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिनाही आणखी दिलासादायक ठरला. कारण, ऑक्टोबरच्या तुलनेत निम्मेच रुग्ण आढळून आले. नोव्हेंबरमध्ये चार हजार ४५० बाधित निष्पन्न झाले, तर सहा हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. डिसेंबरमध्येही हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त तीन हजार ५५२ आढळून आले, तर तीन हजार ३१२ मुक्त झाले, तर ६८ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात तर १ हजार ४०२ रुग्ण आढळले, तर २६ जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनामुक्तची संख्या ९७८ राहिली.

जानेवारीच्या मध्यापर्यंत तरी कोरोना नियंत्रणात होता. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. फेब्रुवारी महिन्यात तर सतत बाधितांचा आकडा वाढू लागला. तसेच मृतांचीही संख्या वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत एक हजार ८३ रुग्ण आढळून आलेले आहेत, तर ९२४ जण मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांत १५ हजार ९३८ संशयितांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यावरून फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

कोट :

कोरोना अजुन संपलेला नाही, तरीही अनेक नागरिक विनामास्क फिरतात. शासन नियमांचे पालन करत नाहीत. नागरिकांची ही भूमिका चुकीची आहे. शासन नियमांना कंटाळून चालणार नाही. आपण गाफील राहिलो तर कोरोना आणखी जवळ येईल. काळजी घेतली तर स्वत:सह इतरही सुरक्षित राहतील.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

.............................................................