शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती : विनय गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : ''जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या जल जीवन मिशनमध्ये सातारा जिल्ह्याने २०२०-२१ मध्ये दिलेल्या ...

सातारा : ''जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या जल जीवन मिशनमध्ये सातारा जिल्ह्याने २०२०-२१ मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार १ लाख ४७ हजार ६० इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,'' अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजे १ लाख ४७ हजार ६३२ इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. या उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी १००.३९ इतकी आहे. जल जीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना असून, यामध्ये राज्य आणि केंद्राचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. २०२४ सालापर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिव्यक्ती रोज किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. ''हर घर नल से जल'' असे घोषवाक्य घेऊन २०२०-२१ सालापासून जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्व परिस्थितीत शाश्वत पद्धतीने मिळावा, असे मोठे उद्दिष्ट जनजीवन मिशनचे आहे.

त्यानुसार सातारा जिल्ह्याने उद्दिष्ट मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर यंत्रणा कार्यान्वित केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग यांनी काटेकोर नियोजन केले. तालुका पातळीवर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा सर्वच घटकांनी याबाबत योग्य नियोजन केले. ग्रामीण जनतेचीही उत्कृष्ट साथ मिळत आहे. त्यामुळे १०० टक्के उद्दिष्टप्राप्ती झाली, असेदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.