शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाळू डंपर अडविता १० लाखांचा दंड मिळे !

By admin | Updated: February 11, 2016 23:59 IST

अनधिकृत गौणखनिज वापर : फलटण तालुक्यात मंडलाधिकारी, तलाठी कोतवाल यांची पथकाची कारवाई

फलटण : ‘जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये अनाधिकृत गौणखनिज वापराविरुद्ध धडक मोहीम राबवून २० वाहनांकडून दहा लाख सतराशे चौतीस रुपये दंड वसूल केला आहे. तसेच भरारी पथकाने पकडलेला एक ट्रॅक्टर पळून गेल्याने व अवैद्य माती उत्खनन केल्याने त्यांचे विरुद्ध शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख व तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.फलटण तालुक्यात अनाधिकृत गौणखनिज वाहतूक थांबविण्यासाठी संबंधित मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांची मंडल निहाय एकूण पाच फिरती पथके स्थापन करणेत आलेली आहेत. त्या पथकामार्फत अनाधिकृत गौणखनिज वाहतुकीची वाहने पकडून कारवाई करणेत आलेली आहे. ही कारवाई करताना वाहनामध्ये आढळून आलेल्या वाळूच्या बाजारभावाच्या किमतीच्या पाच पट दंड वसूल केला जातो व या वाहनाची वाळू जप्त केली जाते. त्यानुसार जिंती (फलटण )येथे कारवाई करण्यात आली. मागील महिनाभरात दंड वसूल करण्यात आला. यामध्ये दत्तात्रय महादेव कोळेकर (१०६२०० ) कंसात दंडाची रक्कम, देविदास मल्हारी लोखंडे (१०६२०० ),लहू पिराज गोफणे (२६,५०० ), संतोष हणमंत देशमुख (२६,५००), दीपक सुभाष गायकवाड (१०६२००), अक्षय नारायण सोडमिसे (१०६२००), अंकुश लोखंडे (८,३१९), रोहिदास रामदास गायकवाड (७९,६००),दत्तात्रय हिरामन विटकर (२६,५००), कैलास सीताराम ढेकळे (४०,०००), रामा मोहन काळे (२६,५००), ईश्वर ज्ञानदेव गुंजाळ (२६,५००), लक्ष्मण लोखंडे (९०१५), जालिंदर बापूराव लोंढे (३७,५००),बापू नागू माने ( ३७,५००), स्वप्नील पोपट जाधव (३७,५००), सूरज आनंदा पवार (२२,०००), विष्णू अर्जून भोसले (१,०००००), नीलेश बाबा जाधव (३७,५००), नवनाथ पोपट जाधव (३७,५००) असा एकत्रित एकूण दहा लाख सतराशे चौतीस रुपये दंड वसूल केला. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवरील कारवाई यापुढे ही चालू राहील असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)कारवाईने माफिया हादरलेफलटण तालुक्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गौणखनिज माफिया पुरतेच हादरले आहेत. शासकीय यंत्रणांनी राबविलेल्या दंड वसुलीमुळे सध्या सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे.