आष्टा : आष्टा येथील जि. प. शाळा क्रमांक ९ ची मॉडेल स्कूलसाठी निवड ही आष्टा शहरासाठी भूषणावह गोष्ट आहे. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
आष्टा येथील जि. प. शाळा क्रमांक ९ ची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाल्यानंतर आयोजित मेळाव्याप्रसंगी वैभव शिंदे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी गटशिक्षणाधिकारी रघुनाथ आटूगडे, वाळवा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी, सुनील आंबी आणि शाखा अभियंता अजित ढोकळे, नगरसेवक विशाल शिंदे, केंद्रप्रमुख प्रकाश काळोखे, नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, अर्जुन माने, सारिका मदने, माजी नगराध्यक्षा झीनत आत्तार, डॉ. प्रकाश आडमुठे, एन. डी. कुलकर्णी, उद्योजक प्रकाश रुकडे, नितीन झंवर, मनीषा मोटकट्टे, सदस्य राजाराम देसावळे, विकास गायकवाड उपस्थित होते.
झुंजारराव पाटील म्हणाले, जि. प. शाळेला पालिकेच्या वतीने कंपाउंड वॉल बांधून देण्यात येईल.
सर्व शिक्षकांनी एक लाख रुपये, तर नागरिकांनी दिलेल्या रकमेसह अडीच लाख रुपये जमा करण्यात आले. मॉडेल स्कूल शाळा सुधार समितीचे अध्यक्ष म्हणून वैभव शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी गुणवंतांचा गौरव करण्यात आला. समीर नायकवडी यांनी स्वागत केले, तर मुख्याध्यापिका मंगल पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १७०१२०२१-आयएसएलएम-आष्टा झेडपी शाळा न्यूज
गौरी कुलकर्णी यांचा सत्कार करताना वैभव शिंदे, मंगल पाटील, समीर नायकवडी, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, छायादेवी माळी, प्रकाश काळोखे.