शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘जलदूत’ आजपासून पुन्हा

By admin | Updated: May 25, 2016 00:20 IST

वारणेच्या पाण्याची प्रतीक्षा : रेल्वे स्थानकासाठी पाणी उपसा

मिरज : म्हैसाळ योजना व जलदूत एक्स्प्रेस गेले पाच दिवस बंद आहे. वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास सायंकाळी म्हैसाळ योजनेचे पंप व जलदूत एक्स्प्रेसद्वारे लातूरला पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकात पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात जॅकवेलजवळील गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढून एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद आहेत. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला आहे. पाणी उपसा थांबल्याने गेले पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस थांबली आहे. बुधवारी नदीपात्रात पाणी आल्यास सायंकाळी जलदूत एक्स्प्रेस लातूरला जाण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्याने, मिरजेत पाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. म्हैसाळ योजना बंद पडल्याने म्हैसाळचे पंप कधी सुरु होणार, याची शेतकरी वाट पाहत आहेत. मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वे स्थानकाला व रेल्वे वसाहतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची ही स्थिती दोन दिवसांमध्ये बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर)रेल्वे स्थानकात पाणी टंचाई : प्रवाशांचे हाल मरजेतील हैदरखान विहिरीतही पाणी नसल्याने रेल्वे स्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रेल्वे गाड्यांत पुणे स्थानकावरच पाणी भरण्यात येत असून मिरज स्थानकात प्लॅटफॉर्मवरील नळाचे पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नदीत उपलब्ध असलेले पाणी एका मोटारीद्वारे उपसा करुन रेल्वे स्थानकास पाणी पुरवठ्याच्या प्रयत्न सुरू आहे. पाण्याअभावी रेल्वे स्थानकावर साचलेला मैला साफ करता आला नसल्याने स्थानक परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.