शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळगावमध्ये मांडूळ साप बाळगणाऱ्या तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : धुळगाव (ता. तासगाव) येथे मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. तनवीर रहमान कामिरकर (वय २४) आणि फिरोज सलीम मुजावर (२४, दोघेही रा. धुळगाव ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा साप जप्त केला आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक तासगाव विभागात गस्तीवर होते. यावेळी पथकातील कर्मचारी अजय बेद्रे यांना माहिती मिळाली की, धुळगाव येथील दोन तरुणांनी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप जवळ बाळगला आहे. त्यानंतर एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या वनक्षेत्रपाल कौशला भोसले यांना याची माहिती देत एलसीबी व वनविभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. धुळगाव येथील फिरोज मुजावर याच्या शेतातील शेडमध्ये एका बॅरेलमध्ये हा साप ठेवण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश आलदर यांनी कारवाई केली.