शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

युवा संघर्ष संदेश जथ्याचे सांगलीत स्वागत

By admin | Updated: October 6, 2015 00:34 IST

कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारख्या थोर समाजसेवकांना गमावण्याची वेळ पुरोगामी समाजावर आली आहे. त्यामुळे आधुनिक काळाकडे जाण्यापासून रोखणाऱ्या प्रवृत्तींची समाजाला ओळख होण्यासाठी युवा संघर्ष संदेश जथ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रीती शेखर यांनी सोमवारी सांगितले. या संदेश जथ्याचे सांगलीत जोरदार स्वागत करण्यात आले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्यावतीने कोल्हापूर येथून निघालेल्या संदेश जथ्याचे सांगलीत आगमन झाले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या जथ्याचे स्वागत करण्यात आले. अवैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी व जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी समाजातील काही प्रवृत्तींकडून समाजात बदल घडवणाऱ्या समाजसेवकांवर हल्ले होत आहेत. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र ही राज्याची ओळख कायम राहावी, हा या जथ्याचा मुख्य उद्देश आहे. हा संदेश जथा १६ जिल्ह्यांचा दौरा करणार असून ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फेडरेशनच्या राज्य अधिवेशनात सामील होणार आहे. यावेळी रत्नाकर नांगरे, डॉ. प्रदीप पाटील, गौतमीपुत्र कांबळे, बिराज साळुंखे, विशाल साळुंखे, उमेश देशमुख, सरनाथ कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कवठेमहांकाळमध्येही स्वागत-कवठेमहांकाळ : युवा संघर्ष जथ्याचे कवठेमहांकाळ येथे विविध पुरोगामी संघटनांच्या तसेच राजर्षी शाहू विचार मंचच्यावतीने स्वागत करण्यात आले. संस्थापक प्रा. दादासाहेब ढेरे, कॉम्रेड नामदेवराव करगणे यांनी स्वागत केले. यावेळी प्रीती शेखर, सुभाष कोळी, दिलीप शुक्ला, उमेश देशमुख आदी होते.