शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापासून वर्षभर सुरक्षित भिंत पाच मिनिटांच्या गाफीलपणामुळे ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने वर्षभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. कोरोनापासून बचाव केला. पण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने वर्षभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. कोरोनापासून बचाव केला. पण महिन्याभरापूर्वी पाच मिनिटांचा गाफीलपणा नडला आणि कोरोनाने संपूर्ण कुटुंबाला ग्रासले. एका सदस्याचा मृत्यूही ओढवला.

मिरजेतील ही कहाणी कोरोनापासून दक्षतेसाठी मोलाचा धडा घालून देणारी ठरली आहे. कोरोनाबाधित जात्यात असले तरी बेफिकिरीने वागणारे सारेच सुपात आहेत, असाच संदेश या घटनेने दिला आहे. पंढरपूर रस्त्यावरील एका वसाहतीत राहणाऱ्या या कुटुंबाने गेल्यावर्षी मार्चमध्येच बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून टाकला. पती-पत्नी, मुलगा आणि सून असे चौकोनी कुटुंब. वडील सेवानिवृत्त तर मुलगा पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला. लॉकडाऊनमुळे मुलाचे वर्क फ्रॉम होम सुरु होते. कुटुंबाने किराणा, औषधांसह अन्य जीवनावश्यक बाबी घरपोहोच मागवल्या. डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा आलेख खालावला तरी बाहेर पडले नाहीत. कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवले. सुरक्षेचा बुरुज वर्षभर मजबूत ठेवला.

पण महिन्याभरापूर्वी बुरुजाला सुरुंग लागला. एका अपघातग्रस्त नातेवाईकावर मिरजेत शस्त्रक्रिया झाली. रितभात म्हणून वडील विचारपूस करायला रुग्णालयात गेले. पाचच मिनिटात परतलेदेखील. पण कोरोना जणू टपूनच होता. दोन-चार दिवसात ताप चढला. कोरोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. पाठोपाठ अन्य तिघेही कोरोनाग्रस्त झाले. माय-लेकाला रुग्णालयात दाखल केले तर सासरा व सुनेवर घरगुती विलगीकरणातच उपचार झाले. दरम्यान, उपचारानंतर मुलगा कोरोनामुक्त झाला, आईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनत गेली. २३ दिवसांच्या अयशस्वी उपचारानंतर गुरुवारी (दि. २९) तिचे प्राणोत्क्रमण झाले. वर्षभराची सुरक्षिततेची भिंत पाच मिनिटांच्या गाफीलपणामुळे ढासळली.

चौकट

बाळ-बाळंतीण दोघेही कोरोनाबाधित

दुर्दैवाचा फेरा येथेच संपला नाही. कोरोनाग्रस्त सुनेची प्रसुती झाली, तेव्हा बाळदेखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही स्वतंत्र उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, पण तेवीस दिवस रुग्णालयात कोरोनाशी झुंजणाऱ्या सासूला आपण आजी झाल्याचे शेवटपर्यंत कळले नाही. घरात अपत्यप्राप्तीचा आनंद मानायचा की कर्त्यासवरत्या बाईच्या मृत्यूचा शोक करायचा, असा प्रश्न या कुटुंबापुढे आहे.