शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रघुराज मेटकरी यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : उत्कृष्ट वाग्मय निर्मितीचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार विटा (जि. सांगली) येथील साहित्यिक रघुराज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : उत्कृष्ट वाग्मय निर्मितीचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार विटा (जि. सांगली) येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या ‘स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णरत्ने’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनकरराव पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

कोल्हापूर येथील शांताई शिक्षण संस्थेच्या सन २०१९-२० या वर्षात प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, रोख ५ हजार रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे आहे. या पुरस्कार निवड समितीत प्रा. कीर्ती राहुल कदम, अभियंता अजिंक्य पाटील, प्रा. धनाजी वाघ, प्रा. तानाजी निकम व प्रा. डॉ. दिनकरराव पाटील यांचा समावेश होता.

विटा येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांना ‘यशवंतराव चव्हाण’ यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. मेटकरी हे विटा येथे गेली ३९ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. त्यांचे विविध साहित्यही प्रकाशित झाले आहे.

चौकट

आजपर्यंतचा गौरव...

रघुराज मेटकरी यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाग्मय निर्मितीचा ‘ग. ह. पाटील पुरस्कार’, राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘व्यसनमुक्ती कार्य पुरस्कार’, पुणे येथील विनोद प्रतिष्ठानचा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ‘उत्कृष्ट वाग्मय पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.