शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

य. पा. वाडीतील रस्ते कामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटील वाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत झालेल्या रस्ते कामात ठेकेदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटील वाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत झालेल्या रस्ते कामात ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य माणिक तळे यांनी केला आहे. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन चौकशीची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकारी, ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

य. पा. वाडीतील तळेवस्तीकडे जात असणारा रस्ता जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत झाला आहे. करगणी येथील श्री राम मजूर सहकारी सोसायटीने हे काम केले आहे. चार लाख रुपये या रस्त्यावरती खर्च केले असून, खडीकरण व एक पूल बनविताना १० सिमेंट पाईप टाकण्याचे काम होते. मात्र, ठेकेदाराने काम करत असताना पूल बनविताना फक्त दोनच सिमेंट पाईप टाकल्या आहेत. काम होत असताना तळेवस्ती येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देत काम चुकीच्या पद्धतीने झाल्याची तक्रार केली आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे मूल्यांकन करावे व जितके काम झाले आहे, तितकेच पैसे संबंधित ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी केली होती. मात्र, ठेकेदाराने पुलासाठी दहा पाईप मंजूर असताना फक्त दोनच पाईप टाकत काम आटोपून घेतले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केला असून, शासनाची फसवणूक करत जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.