शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारकडून कष्टकरी, शेतकऱ्यांचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:19 IST

जयंत पाटील : कुची येथे जि. प. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कवठेमहांकाळ : शेतकरी, कष्टकरी जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांपेक्षा उद्योजक, भांडवलदार त्यांना जवळचा वाटत आहे, अशी टीका विधिमंडळाचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी केली.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे आर. आर. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेली पाण्याची टाकी, सभामंडप व जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. भाऊसाहेब पाटील, सुनीता पाटील, कुसूम मोटे यांचा जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, गणपती सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील पुढे म्हणाले की, जनतेला आश्वासने देत भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना या सरकारने केवळ तीन छावण्या काढल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. तरीही हे शासन घोषणा करते, पण अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहे. सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत आखडता हात घेत आहे. सत्तेतील सरकारला शेतकरी, कष्टकरी जनताच आता जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सरकारचे धोरण उदासीन आहे. मात्र मतदारसंघात तुम्ही विकास कामे सुचवा, ती आपण पूर्ण करू. तसेच मतदारसंघातील जनता राष्ट्रवादीच्या व आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी सभापती सुरेखा कोळेकर, हणमंतराव देसाई, सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच लखन पवार, उपसरपंच परशुराम जाधव, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, ताजुद्दीन तांबोळी, टी. व्ही. पाटील, नामदेव करगणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)