शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम सुरू

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

तीन एकर जागा : शासनाकडून ५ कोटींपैकी ४0 लाखांचा निधी मिळाला

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याच्या साखर शाळेच्या आवारातील तीन एकर जागेत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात करण्यात आली. या स्मारकस्थळी नागनाथअण्णांच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील कार्य व स्वातंत्र्यानंतर त्यांनी वाळवा परिसराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे. हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याहस्ते या स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा वंदना माने, सरपंच गौरव नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, नीलावती माळी, महादेव कांबळे, कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील उपस्थित होते. स्मारकासाठी शासनाने ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ४० लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या स्मारकाचे भूमिपूजन २४ मार्च २०१३ रोजी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याहस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले होते. तसेच १५ आॅगस्ट रोजी तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. स्मारकाचा आराखडा आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी तयार केला असून, स्मारकाचे काम इंजिनिअर वसंत वाजे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यावेळी नायकवडी म्हणाले की, हुतात्मा समूहाच्यावतीने निधी उभारून नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम हाती घेतले जाणार होते. पण घरातील व्यक्तीनेच स्मारक उभारण्यापेक्षा राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला. स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी उपाध्यक्ष दिनकर बाबर, शिवाजी सापकर, सदाशिव जाधव, बी. आर. थोरात, राजेंद्र साळुंखे, विश्वास थोरात, अशोक माने, भगवान पाटील यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)