शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी नाकारले प्रगणकाचे काम

By admin | Updated: October 7, 2015 00:01 IST

तहसीलदारांना निवेदन : तासगाव तालुक्यातील १३४ शिक्षक

तासगाव : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या १३४ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाचे ओझे जास्त असल्यामुळे शिक्षकांनी प्रगणकाचे काम नाकारले आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय नोंदवही अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील १३४ शिक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र शिक्षकांकडे सद्यस्थितीत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, शिक्षण हक्क अधिनियम, सरल माहिती अद्ययावतीकरण, शिक्षणाधिकाऱ्यांचे साडेनऊ ते साडेपाच वाजेपर्यंत शालेय कामकाज करण्याचे आदेश आहेत. तासगाव तालुका प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा, जिल्हा परिषदेची शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच जादा तासांचे काम आहे. परीक्षांचाही कालावधी आहे. त्यामुळे शिक्षकांना हे काम करणे शक्य नसल्याने, प्रगणकाचे काम नाकारत असल्याचे निवेदन नियुक्ती केलेल्या शिक्षकांकडून तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शब्बीर तांबोळी, शिवाजी पवार, रघुनाथ थोरात, प्रवीण जाधव, संजय शिंंदे, अण्णासाहेब गायकवाड, प्रभाकर माने, दगडू जाधव, मच्छिंद्रनाथ कांबळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार : गुरवयावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी अविनाश गुरव म्हणाले, शिक्षकांना नैसर्गिक आपत्ती, जनगणना, मतदान याव्यतिरिक्त अन्य कोणतेही शालाबाह्य काम देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. यापूर्वीच तालुक्यातील तीनशेहून अधिक शिक्षकांची मतदान पुनरिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रगणक म्हणून शिक्षकांची नेमणूक करणे अन्यायकारक ठरणार आहे. याबाबत बुधवारी शिक्षण सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांना आमची भूमिका सांगितली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.