शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महापौरांच्या घरावर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: September 13, 2016 00:51 IST

पाण्यासाठी आंदोलन : शिकलगार यांना घेराव

सांगली : शहरातील शामरावनगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात सोमवारी महिलांनी महापौर हारुण शिकलगार यांच्या घरावर धडक दिली. तब्बल तासभर या महिलांनी महापौरांना घेराव घालून जाब विचारला. अखेर शहराच्या इतर भागातील पाणीपुरवठा कमी करून शामरावनगर परिसरात सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. शामरावनगर परिसर हा महापौर शिकलगार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या परिसरातूनच नागरी सुविधांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यापूर्वी पावसाळ्यात चिखल, साचलेले पाणी यावरून नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. त्यात आता अपुऱ्या पाणीपुरवठ्याची भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून मॉडर्न कॉलनी गल्ली एक ते तीन, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, विश्वविजय चौक या परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दिवसभरात केवळ अर्धा तासच पाणी सोडले जाते. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर सोमवारी या परिसरातील शंभरहून अधिक महिलांनी सकाळी सात वाजता थेट महापौर शिकलगार यांचे घर गाठले. महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महिलांनी महापौरांना धारेवर धरले. तब्बल तासभर या महिलांनी महापौरांना घेराव घातला होता. शिकलगार यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना बोलावून घेतले. या परिसराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल उपाध्ये यांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर महापौर शिकलगार व उपाध्ये यांनी शामरावनगर परिसराची पाहणी केली. त्यानंतर शहराच्या इतर भागातील पाणीपुरवठा कमी करून सायंकाळी या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. (प्रतिनिधी)टाकी तयार, पाणी नाहीशामरावनगरमधील हा परिसर हिराबाग पाण्याच्या टाकीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या शेवटच्या टोकाला हा परिसर असल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. महापालिकेने कोल्हापूर रोड व हनुमाननगर या दोन ठिकाणी नवीन टाकी उभारली आहे. पण ७० एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र अपुरे असल्याने नवीन टाकीला अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्यापासून वंचितच आहेत.